Health Tips In Marathi : अशी घ्या हातांची काळजी…

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- आपण दिवसभर काही ना काही काम करीत राहतो. अशावेळी हातांची काळजी घेणेही आवश्यक असते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हातांना मालीश करणे, ते मुलायम राखणे आपलेच तर काम आहे. हातांकडे लक्ष देऊन आपण अनेक समस्या दूर ठेवू शकतो. कसे ते जाणून घ्या.

कडक साबणाने हात धुऊ नका :- ज्या साबणाने आपण आपले हात धूत आहात त्याविषयी माहिती घ्या. आपल्या साबणात ऑँलोव्हेश वा शिया बटरसारखे मॉइश्चरायझिंग घटक असायला हवेत.

Advertisement

 उन्हाने मिळेल दिलासा :- कामाचे ओझे वाढल्यामुळे काहींचे हात दुखत ही असतात. थोडे ऊन त्वचेसाठी खूप आवश्यक असते. थोडा वेळ उन्हात राहण्याचा प्रयत्न करा. काही वेळ उन्हात राहण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आपले शरीर व्हिटॅमिन डी चे उत्पादन करू शकेल. व्हिटॅमिन डी आपल्या जॉइंट्सना दुखण्यापासून वाचण्यात मदत करण्यासाठी आवश्यक असते.

रवोबरेल तेलाने मालीश :- रूक्ष त्वचेसाठी खोबरेल तेलही खूप फायदेशीर असते. खोबरेल तेल ड्राय स्किनच्या उपचारासाठी पेट्रोलियम जेलीइतकेच सुरक्षित व प्रभावी आहे. हे स्किन च्या डिहायड्रेशन मध्ये खूप सुधारणा करते. याने मालीश केल्यास हातांना आराम मिळतो.

नखे नियमितणे कापावीत : – नखे कापण्यासाठी आपल्या पर्ससल नेलक्लिपरचा वापर करा. आपले नेलक्लिपर कधीही कोणाशीही शेअर करू नका. कारण यामुळे नखातील रोगजंतू इतर लोकांमध्ये पसरू शकतात. गंजलेल्या नेलक्लिपरचा वापर करू नका. कारण यामुळे त्वचेला इन्फेक्शन होऊ शकते.

Advertisement

हात एक्सफोलिएट करा : – ज्या प्रकारे आपण आपला चेहरा एक्सफोलिएट करता, तीच प्रक्रिया आपल्या हातांवरही आजमावयाला हवी. ही रूक्ष त्वचा हटवण्यास व हात मुलायम राखण्यास मदत करते. ब्राउन शुगर व जैतून तेलाचा वापर करून हात स्क्रब करू शकता.

मुलायमपणा दिकवून ठेवा

हात रूक्ष झाल्यास अलोव्हेरा जेल ड्राय भागात लावू शकता. कारण अँलोव्हेरा सर्वोत्तम मॉइश्चरायझर पैकी एक मानले जाते.

Advertisement

काही शोधांमध्ये आढळले की, मध त्वचेच्या रूक्षपणासह अनेक प्रकारच्या त्वचाविकारांत फायदेशीर असतो. हा रूक्ष त्वचपासून मुक्‍ती मिळवण्याचा उत्तम घरगुती उपाय आहे.

जास्त रूक्ष त्वचा असल्यास जैतून तेल (ऑलिव्ह ऑइल) चमत्कारी काम करते. ऑलिव्ह ऑइलने गरजेनुसार आपली त्वचा मालिश करू शकता. हे लावल्यानंतर काही तास वा रात्रभर ग्लोव्हज वा प्लॅस्टिक रॅपने झाकून ठेवा.

Advertisement