उपमुख्यधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अधिकारी गेले रजेवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-   अतिक्रमण काढल्याचा राग धरत शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

तसेच संतप्त पदाधिकाऱ्यांनी उपमुख्याधिकाऱ्यांचे दालन व बांधकाम विभागातील संगणक, टेबल व काचांची तोडफोड केली. याचाच निषेध म्हणून कार्यालयातील अधिकारी बेमुदत रजेवर गेले आहे.

दरम्यान शासकीय अधिकारी व कर्मचारी हे काम करीत असताना वैयक्तिक लाेभ टाळून समाजाच्या हितासाठी काम करीत असतात. कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी अत्यंत कर्तव्यनिष्ठ काम करीत आहे.

तसेच त्यांच्यावर कोरोनाचा अतिरिक्त कामाचा ताण आहे. त्यांना अशा पद्धतीने नगरसेवक व कार्यकर्ते यांच्याकडून शिवीगाळ व मारहाण होणे योग्यबाब नाही. अशा मारहाणीच्या घटनांमुळे अधिकारी व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे बाबत अनास्था तयार झाली आहे.

यामुळे राजकीय व्यक्तींच्या या निषेधार्थ कारनाम्यामुळे अधिकारी हे बेमुदत रजेवर गेले आहे. दरम्यान याबाबत वरिष्ठांना निवेदन देण्यात आले असून यावर दिगंबर वाघ, पल्लवी सूर्यवंशी, ज्ञानेश्वर चाकणे, रोहित सोनवणे,

बालचंद्र उंबरजे, तुषार नालकर, नितेश मिरीकर, दीपक बडगुजर, प्रमोद ढोरजकर, सोमनाथ नारळकर, अरुण तोगे, सुमित काळोखे, महेश काकडे, ज्ञानेश्वर जगताप, श्वेता शिंदे, ऋतुजा पाटील, बी. एम. पारधी यांच्या सह्या आहेत.