file photo

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- सासऱ्यानेच चक्क सुनेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडला असून, याप्रकरणी सासऱ्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एक महिला आपल्या पतीसह व दोन मुलांसह शेतीवर उपजीविका करून राहते. दरम्यान पीडित महिलेला त्वचेचा आजार असल्यामुळे घरातील लोक तिला कायम त्रास देतात.

दि.२५ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता पीडित महिला व तिची मुले जेवण करून झोपण्यासाठी गेले असता, महिलेचा सासरा दारू पिऊन तिच्याजवळ आला व तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.

सदर पीडितेने नकार देत सासऱ्याला घराच्या बाहेर काढून दिले. घरातून बाहेर जाताना सासऱ्याने पीडित महिलेला शिवीगाळ करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.