अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- » कोणताही आर्थिक निर्णय घेताना आपण ही गोष्ट कधीच विसरू नये की, आपण मुळात स्वत:साठी आणि कुट्रंबासाठी मेहनत करत असतो.
» एखाद्या फसव्या योजनेमुळे आपलं नुकसान होण आपली कष्टाची कमाई हरवली जाणं. हे आपल्याला कधीच परवडणार नाही. म्हणून सावध राहायला हवं.
» योजना कोणतीही असली; तरीही तिची नीट माहिती करुन घेवली पाहिणे. आपण स्वतः अथ्यास केला पाहिजे गुतवणूक किती आणि फ्रतावा किती; याचा हिशेब नीट केला पाहिजे झटपट पैसे मिळाले तर आनंद आहेच,
पण अशा एखाद्या योजनेत आपले पैसे सुरक्षित राहतील ना आणि आपल्या कुटुंबीयांना भविष्यकाळात काही त्रास होणार नाही ना, या प्रश्नांवर सखोल चिंतन केलं पाहिजे. एखाद्या योजनेच्या मोहापायी आपण त्यांचं भवितव्य धोक्यात तर घालत नाही ना, हा प्रश्न पडलाच पाहिजे.
विशेषतः आपण स्वतः आणि आपले कुटुंबीय यांच्यासाठी काही रक्कम निश्चितपणेर बाजूला काढून ठेवावी. कोणत्याही परिस्थितीत त्या रकमेला हात लावण्याची वेळच येऊ नये, याची काळजी घ्यावी. ती रक्कम वगळता मग जी काही रक्कम उरेल, त्यासह काही प्रयोग नक्की करून पाहायला हवेत.
मात्र, ते कायदेशीर असतील आणि सुरक्षित असतील, याची खातरजमा आधीच करून घेतली पाहिजे. झटपट पैसे मिळवून देणाऱ्या कंपन्यांचे उद्योग नवीन नाहीत. वर्षानुवर्षे हे उद्योग सुरू आहेत, त्यांनी केलेल्या फसवणुकीच्या बातम्या छापून येत आहेत. लोक त्या बातम्या वाचून चर्चा करत आहेत आणि थोड्याच दिवसांत ते सगळं विसरूनही जात आहेत.
अगदी वर्षानुवर्ष हेच सुरू आहे. त्यामुळेच हे चक्र थोड्या थोड्या अंतराने आणि वेगवेगळ्या नावाने सुरूच राहिल्याचं दिसतं. म्हणूनच आर्थिक बाबतीत नेहमीच सजग राहायला हवं. कोणताही आर्थिक निर्णय घेताना आपण ही गोष्ट कधीच विसरू नये की, आपण मुळात स्वत:साठी आणि कुटुंबासाठी मेहनत करत असतो.
आपलं घर, नातेवाईक यांच्या सुख-समाधानासाठी कष्ट करतो. ते कष्टाने मिळालेले पैसे आपल्यालाही आनंद देतात. त्यामुळेच ते जपून खर्च केले पाहिजेत किंवा सजगपणे गुंतवले पाहिजेत. एखाद्या फसव्या योजनेमुळे आपलं नुकसान होणं, आपली कष्टाची कमाई हिरावली जाणं, हे आपल्याला कधीच परवडणार नाही.
म्हणून सावध राहायला हवं. प्रश्न फक्त आपले पैसे बुडण्याचा नसतो. ते बुडले की बुडतातच, पण आपण अनेक गोष्टींचा त्याग करून एकेक पैसा जोडलेला असतो, आपण अनेक आवडीनिवडी बाजूला ठेवून पैसा जपलेला असतो, त्यासाठी आपण खूप मेहनत केलेली असते. त्यासाठी भरपूर वेळ दिलेला असतो.
एखाद्या योजनेत आपण ते पैसे गुंतवल्यानंतर फसवणूक झाली, तर या सगळ्या गोष्टीवर पाणी फेरले जाते. आपली सगळी मेहनत वाया जाते, म्हणूनही आपण जपून वागायला हवं. म्हणून योजना कोणतीही असली, तरीही तिची नीट माहिती करून ध्यावी. आपण स्वतः अभ्यास केला पाहिजे. गुंतवणूक किती आणि परतावा किती, याचा हिशेब नीट करावा.