OnePlus 10R : 50MP कॅमेरा असणाऱ्या वनप्लसच्या लोकप्रिय स्मार्टफोनवर मिळत आहे आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus 10R : वनप्लसचे सर्वच स्मार्टफोन हे ग्राहकांच्या मनावर राज्य करत असतात. कंपनीही ग्राहकांची मागणी लक्षात घेता सतत नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. कंपनीने नुकताच OnePlus 10R हा स्मार्टफोन लाँच केला आहे.

या स्मार्टफोनची मूळ किंमत 38,999 रुपये आहे. मात्र तुम्ही हा फोन खूप स्वस्तात खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. हे लक्षात ठेवा की ही ऑफर फक्त काही दिवसांसाठीची असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या.

कंपनीच्या OnePlus 10 R 5G मध्ये MediaTek Dimensity 8100 Max प्रोसेसर कंपनीने दिला आहे. स्टोरेजचा विचार केला तर तो 12GB पर्यंत RAM सह 256GB पर्यंत स्टोरेजसह येतो. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.7-इंचाचा IRIS डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 5000mAh बॅटरीसह 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट प्रदान केला आहे.

किंमत

हा फोन सिएरा ब्लॅक, प्राइम ब्लू आणि फॉरेस्ट ग्रीन कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येणार आहे. स्टोरेजचा विचार केला तर Amazon वर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह OnePlus 10R 5G च्या बेस व्हेरिएंटची मूळ किंमत 38,999 रुपये इतकी आहे. परंतु, आता हे 10% डिस्काउंटनंतर 34,999 रुपयांना लिस्ट करण्यात आले आहे. तसेच या फोनवर अनेक बँक आणि एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहेत.

समजा तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ICICI बँकेचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरत असल्यास तुम्हाला 3,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. इतकेच नाही तर तुम्ही तुमचा फोन एक्सचेंज करून 25,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट तुम्ही सहज मिळवू शकता. या दोन्ही ऑफरचा फायदा घेऊन तुम्हाला हा फोन 28,000 रुपयांना स्वस्तात खरेदी करता येईल. हे लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे.