OnePlus 5G Smartphones : बजेट कमी आहे? 20 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येत आहेत OnePlus चे ‘हे’ स्मार्टफोन, पहा ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus 5G Smartphones : भारतीय टेक बाजारात वनप्लसचे नवनवीन स्मार्टफोन लाँच होत आहेत. सर्वच स्मार्टफोनमध्ये एकापेक्षा जबरदस्त फीचर्स देण्यात येत आहेत. त्यामुळे हे स्मार्टफोन खरेदी करत असताना ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

परंतु जर तुम्ही आता कमी किमतीत OnePlus चे स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही आता 20 हजारांपेक्षा कमी किमतीत शानदार फीचर्स असणारे OnePlus चे स्मार्टफोन सहज खरेदी करू शकता. कसे ते पहा.

ग्राहकांना आत्तापर्यंत 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत केवळ एक स्मार्टफोन OnePlus Nord CE 2 Lite 5G खरेदी करता येत होता. परंतु आता कंपनीकडून OnePlus Nord CE 3 Lite 5G हा त्याचा उत्तराधिकारी म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही स्मार्टफोनच्या किमतीत फक्त 1,000 रुपयांचा फरक असल्यामुळे जवळपास अनेकजण नवीन अपग्रेडेड व्हर्जन घेऊ इच्छितात. कंपनीने या दोन्ही स्मार्टफोन्सला भिन्न फीचर्स आणि कॅमेरा सेटअप दिला आहे.

OnePlus Nord CE 3 Lite 5G फीचर्स जाणून घ्या

नवीनतम OnePlus बजेट फोनमध्ये फुल HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.72-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात येत आहे. तो Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरद्वारे समर्थित असून या स्मार्टफोनची 8GB स्थापित रॅम विशेष व्हर्च्युअल रॅम वैशिष्ट्यासह 16GB पर्यंत वाढवण्यात येईल.

या स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर 108MP प्राथमिक लेन्ससह 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स उपलब्ध असणार आहे. या फोनमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा तसेच 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह वापरकर्त्यांसाठी 5000mAh बॅटरी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जाणून घ्या OnePlus Nord CE 2 Lite 5G चे फीचर्स

मागील वर्षी कंपनीने OnePlus Nord CE 2 Lite 5G हा फोन लाँच केला आहे. यात कंपनीकडून 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह मोठा 6.59-इंचाचा डिस्प्ले देण्यात येत आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह येत आहे. याच्या स्टोरेजबद्दल विचार करायचा झाला तर यात 8GB पर्यंत रॅमसह 128GB स्टोरेज दिले जात आहे.

या फोनच्या मागील पॅनलमध्ये 2MP डेप्थ लेन्स आणि 64MP मुख्य कॅमेरा सेन्सरसह 2MP मॅक्रो लेन्स देण्यात येत आहेत. या फोनमध्ये 16MP SonyIMX471 सेल्फी कॅमेरा सेन्सर उपलब्ध असणार आहे. यात 5000mAh बॅटरी असून जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देते. हा फोन Android 12 वर आधारित OxygenOS सह असून जो नवीनतम आवृत्तीवर अपडेट करण्यात आला आहे.

OnePlus च्या अधिकृत वेबसाइट आणि स्टोअर शिवाय, हे दोन्ही स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून खरेदी करू शकतात. निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट आणि ईएमआय व्यवहारांच्या बाबतीत, त्यांना 10% पर्यंत अतिरिक्त सूट देण्यात येत आहे. इतकेच नाही तर ग्राहक आता त्यांच्या जुन्या फोनची देवाणघेवाण करून नवीन फोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकतात.