OPPO Smartphone 5G : होईल हजारोंची बचत! Oppo Reno7 वर मिळत आहे आतापर्यंतची सर्वात मोठी सूट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OPPO Smartphone 5G : भारतातील सर्वात लोकप्रिय कंपनी ओप्पो सतत आपले नवनवीन स्मार्टफोन सादर करत असते, कंपनीच्या अनेक स्मार्टफोन्सला मार्केटमध्ये चांगली मागणी असते. अशातच कंपनीचे फोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालत असतात.

कमी किंमत आणि शानदार फीचर्समुळे कंपनी सतत इतर स्मार्टफोन निर्माता कंपन्यांना टक्कर देत असते. कंपनीने काही दिवसांपूर्वी Oppo Reno7 हा स्मार्टफोन लाँच केला होता. फ्लिपकार्टवर आता हा फोन तुम्ही खूप स्वस्तात खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल.

जाणून घ्या ऑफर

ऑनलाइन वेबसाइट फ्लिपकार्टवर, ओप्पोच्या या शानदार स्मार्टफोनची किंमत 37,990 रुपये इतकी आहे, परंतु आता 23 टक्के डिस्काउंटसह 28,999 रुपयांना विक्री केला जात आहे. त्यामुळे 8991 रुपयांच्या डिस्काउंटसह तुम्ही हा फोन स्वतः खरेदी करू शकता. इतकेच नाही तर, तुम्ही ते फक्त 992 रुपयांच्या मासिक EMI वर खरेदी करू शकता.

कॅमेरा

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोटोग्राफीसाठी कंपनीकडून यात Reno 7 5G मध्ये तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यात 64MP मुख्य कॅमेरासह 8MP कॅमेरा आणि 2MP कॅमेरा याचा समावेश आहे.

काय आहेत फीचर्स ?

कंपनीच्या या फोनमध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीचा MediaTek Dimensity 900 प्रोसेसरने सुसज्ज असणारा हा स्मार्टफोन Android 11 OS सह येत आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500 mAh लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येत असून त्याचा डिस्प्ले 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येत आहे. नंतर त्याचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.