अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- पिपल्स रिपब्लिकन पक्षामध्ये आंबेडकरी चळवळी व आरपीआय (गवई) गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश केला.

याप्रसंगी महिला अध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर वाघमारे, युवक अध्यक्ष अतुल भिंगारदिवे, जिल्हा उपाध्यक्ष अ़ॅड. बाबासाहेब ब्राम्हणे, रऊफ कुरेशी, विशाल गायकवाड़, सुरेश भिंगारदिवे आदि उपस्थित होते. पक्षाची नुकतीच राहुरी येथे जिल्हा बैठक संपन्न झाली.

यावेळी कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करुन नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड म्हणाले, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जयदीप भाई कवाडे यांच्या नेतृत्वात पक्षाची वाटचाल चालू आहे. पक्षाच्यावतीने समाजातील विविध प्रश्नांसाठी नेहमीच पाठपुरावा केला जातो.

त्या माध्यमातून समाज बांधवांनी प्रश्न मार्गी लागत आहे. नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी पक्ष कटीबद्ध असून, त्यामुळेच अनेक युवक पक्षावर विश्वास ठेवून सामिल होत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे जिल्ह्यातील काम उत्कृष्टपणे सुरु असून नूतन पदाधिकार्‍यांनी पदाच्या माध्यमातून समाजातील प्रश्न सोडवावेत, त्यांना पक्षाच्यावतीने सर्वोतोपरि सहकार्य केले जाईल, असे सांगितले. नूतन पदाधिकारी व त्यांची पदे पुढील प्रमाणे: संगमनेर – रावसाहेब जमधड़े (जिल्हा उपाध्यक्ष), जालिंदर बोरुडे (संगमनेर तालुका अध्यक्ष),

गौतम रोहम (युवक तालुका अध्यक्ष), गोरख बनसोडे (तालुका सरचिटणीस), अनीता वाघमारे (महिला तालुका अध्यक्ष), दत्तात्रय वाघमारे (जिल्हा उपाध्यक्ष). राहाता -बाळासाहेब पाळंदे (जिल्हा उपाध्यक्ष,ग्रा.पंचायत सदस्य), जॉन पाळन्दे (तालुका अध्यक्ष, ग्रा.पं. सदस्य), नितिन बनसोडे (युवक तालुका अध्यक्ष), सुनील बनसोडे (तालुका सरचिटणीस),

रविना कदम (महिला तालुका अध्यक्षा). नेवासा-मधुकर पावसे (तालुका अध्यक्ष), भाऊसाहेब गायकवाड़ (जिल्हा उपाध्यक्ष,ग्रा.पं.सदस्य), श्रीकांत भाकरे (युवक तालुका अध्यक्ष), अक्षय गायकवाड़ (तालुका उपाध्यक्ष), विजय कांबळे (तालुका सरचिटणीस,ग्रा.पं. सदस्य), प्रशांत जाधव (तालुका उपाध्यक्ष).

राहुरी- प्रताप पवार (तालुका अध्यक्ष,उपसरपंच), कैलास पवार (जिल्हा उपाध्यक्ष,ग्रा.पं.सदस्य), धोंडीराम दिवे (युवक तालुका अध्यक्ष), करण साठे (तालुका उपाध्यक्ष). पारनेर- राहुल घंगाळे (तालुका अध्यक्ष), प्रल्हाद शिंदे (तालुका सरचिटणीस) आदि कार्यकर्त्यांची निवड करुन नियुक्ति पत्र देण्यात आले.

या सर्वांना पक्षाचे सहप्रवक्ते प्रा.जयंत दादासाहेब गायकवाड़, प्रदेश सचिव सुनील क्षेत्रे, प्रदेश सदस्य नितिन कसबेकर, ज्येष्ठ नेते प्रा.भिमराव पगारे, महेश भोसले आदिनी शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त पदाधिकार्‍यांच्या विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.