Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले की जास्त? जाणून घ्या

Petrol Diesel Price : सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण सुरू असून कच्च्या तेलाचे दर कमी आहे. अशातच 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते.

तरीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतेच बदल किमती केले नाहीत. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जैसे थे आहेत.जाणून घेऊयात आजचे पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना सलग 214 व्या दिवशी दिलासा मिळाला आहे.

ही आहे कच्च्या तेलाची किंमत 

मागील अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत कपात झाल्यानंतर पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. सध्या WTI क्रूड प्रति बॅरल $80 आणि ब्रेंट क्रूड $85 प्रति बॅरल जवळ पोहोचले असून जुलै 2008 नंतर या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहोचल्या होत्या.

तेव्हापासून 46 टक्क्यांच्या घसरणीसह, ते प्रति बॅरल $76 च्या जवळ व्यापार करत आहे, या वर्षातील ही सगळ्यात कमी पातळी आहे. कच्च्या तेलाचा लीटर संदर्भात जर अंदाज लावायचा झाला तर 9 महिन्यांत किंमत 33 रुपयांपेक्षा जास्त कमी झाली पाहिजे. तरीही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात झालेली नाही.

केंद्र सरकारने या अगोदर 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होऊन देशात डिझेल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली होती.

देशातील महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती

दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. तसेच कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर असून चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

सर्वात महाग पेट्रोलआणि डिझेल

राजस्थानातील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात जास्त महाग पेट्रोल-डिझेल विकले जात आहे. गंगानगरमध्ये पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर तर डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर आहे. तसेच हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर- डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर आहे.

स्वस्त पेट्रोलआणि डिझेल

पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेलच्या दराने विकले जात आहे. येथे पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर तर डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे.

आजचे दर

दिल्ली  : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.

कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.

हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.

बंगळुरू : पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.

तिरुअनंतपुरम: पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10  रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.

भुवनेश्वर: पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.

चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.

लखनौ : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.

नोएडा: पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.

जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.

पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

गुरुग्राम: 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.

म्हणून पेट्रोल आणि डिझेल महाग आहे

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत डबल होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल तसेच डिझेलच्या किमती रोज बदलल्या जातात.

असेही जाणून घ्या आजचे दर

पेट्रोल-डिझेलच्या किमती रोज बदलून सकाळी 6 वाजता अपडेट होतात. तुम्हाला पेट्रोल-डिझेलचे दर एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक शहर कोडसह RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि BPCL ग्राहक 9223112222 वर RSP पाठवू शकतात. तसेच HPCL ग्राहक HP Price 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.