Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या की कमी झाल्या? पेट्रोल पंपावर जाण्यापूर्वी जाणून घ्या नवीनतम दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Diesel Price Today : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ नोंदवण्यात आलेली आहे. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता नवीनतम किमती अपडेट करत असतात.

आजही या कंपन्यांनी नवीनतम पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. सर्वात दिलासादायक म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहेत.

जाणून घ्या देशातील महानगरांमध्ये इंधनाचे दर

सध्या दिल्ली शहरांत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबई शहरांत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर विक्री केली जात आहे. तर, चेन्नई शहरांत पेट्रोल 102.63 रुपये तसेच डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

येथे मिळत आहे सर्वात महाग इंधन

राजस्थानातील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात जास्त महाग पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे. गंगानगर जिल्ह्यात पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर तसेच डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर आहे. हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर आहे.

येथे मिळत आहे सर्वात स्वस्त इंधन

पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे. या ठिकाणी पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे.

जाणून घ्या आजचे नवीनतम दर

दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.

कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.

हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.

बंगळुरू : पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.

तिरुअनंतपुरम: पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.

भुवनेश्वर: पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.

चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.

लखनौ : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.

नोएडा: पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.

जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.

पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

गुरुग्राम: 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.

कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे या तेजीनंतर डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $74 आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $79 च्या जवळ पोहोचले असून जुलै 2008 नंतर या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहोचल्या होत्या. देशात या तेजीनंतर इंधनाच्या दरात कोणतीही घट झालेली नाही.

उत्पादन शुल्कात पुन्हा कपात

केंद्र सरकारकडून यापूर्वी म्हणजे 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या आजच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली होती. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले होते. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात करण्यात आली.