Petrol Diesel Rate : वाहनचालकांना दिलासा की दरवाढ सुरूच? लगेचच जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाच्या नवीन किमती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Diesel Rate : मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरु आहे. अशातच आज सरकारी तेल कंपन्यांनी नवीन पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. दररोज सकाळी या किमती अपडेट होत असतात.

परंतु आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल केला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान या किमती जरी कमी झाल्या नसल्या तरीही पेट्रोलने शंभरी पार केले आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीनतम इंधनाच्या किमती.

हे आहेत देशातील शहरांमधील इंधनाचे नवीन दर

सध्या दिल्ली येथे पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर आहे. मुंबई या ठिकाणी पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर असून चेन्नई या ठिकाणी पेट्रोल 102.63 रुपये तसेच डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

या ठिकाणी आहे सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल

राजस्थान येथील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल आहे. गंगानगर जिल्ह्यात पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर तर डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर असून हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर मिळत आहे.

या ठिकाणी आहे सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल

पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे. जिथे पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

जाणून घ्या आजचे नवीन दर

दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.

कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.

हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.

बंगळुरू : पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.

तिरुअनंतपुरम: पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.

भुवनेश्वर : पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.

चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.

लखनौ : पेट्रोल 96.57  रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.

नोएडा: पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.

जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.

पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

गुरुग्राम: 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.

जाणून घ्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची किंमत

मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत घसरण होत आहे. डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 77 डॉलर आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 81 डॉलरच्या जवळ पोहोचले असून जुलै 2008 नंतर या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $140 वर गेल्या आहेत. यानंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही घट झालेली नाही.

उत्पादन शुल्कात कपात

केंद्र सरकारकडून यापूर्वी म्हणजेच 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या आजच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये तर डिझेलवर उत्पादन शुल्कात 6 रुपयांनी कपात केली आहे.

त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाली होती. सरकारच्या या निर्णयानंतर देशात डिझेल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या या मोठ्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारकडूनही व्हॅटमध्ये कपात केली.