Petrol Rate Today : आज 1 मे, अर्थातच महाराष्ट्र दिन. हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. दरम्यान सरकारी तेल कंपन्यांनी आजचे नवीन पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत.
परंतु आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे सर्वसामन्य जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. जरी असे असले तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असल्याने जनतेला याचा खूप मोठा फटका बसत आहे.
जाणून घ्या देशातील शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर
सध्या दिल्ली या ठिकाणी पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबई येथे पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. तसेच कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर मिळत आहे. चेन्नई येथे पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर उपलब्ध आहे.
या ठिकाणी मिळत आहे सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल
राजस्थान येथील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात जास्त महाग पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध आहे. गंगानगर जिल्ह्यात पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर तर हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर आहे.
या ठिकाणी मिळत आहे सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल
पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळत असून या ठिकाणी पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
जाणून घ्या आजचे दर
दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
बंगळुरू: पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.
तिरुअनंतपुरम: पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.
भुवनेश्वर : पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.
चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.
लखनौ : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.
नोएडा: पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.
जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.
पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
गुरुग्राम: 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.
जाणून घ्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मंगळवारी WTI क्रूड प्रति बॅरल $ 78.36 पर्यंत घसरले असून ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 82.35 च्या जवळ गेले आहे. तर जुलै 2008 नंतर या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती या प्रति बॅरल $140 वर पोहोचल्या आहेत. यानंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही घट झाली नाही.
पुन्हा उत्पादन शुल्कात कपात
केंद्र सरकारकडून याअगोदर 21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या आजच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपयांनी कपात केली आहे. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाली होती. देशात यानंतर डिझेल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्राच्या या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारकडूनही व्हॅटमध्ये कपात केली आहे.