Petrol Rate Today : तेल कंपन्यांनी जाहीर केल्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती! पेट्रोल पंपावर जाण्यापूर्वी जाणून घ्या…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Rate Today : सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर करत असतात. आजही तेल कंपन्यांनी नवीन दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवण्यात येतात.

दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती जैसे थे असल्याने तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम ठेवले आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतेही बदल न झाल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जाणून घ्या शहरांमधील दर

दिल्ली या ठिकाणी पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर आहे. मुंबई येथे पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये तसेच डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर उपलब्ध आहे.

या ठिकाणी मिळत सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल

राजस्थान येथील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात जास्त महाग पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध आहे. गंगानगर जिल्ह्यात पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर तर हनुमानगड या जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर आहे.

या ठिकाणी मिळत सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल

पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे. या ठिकाणी पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर तसेच डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे.

जाणून घ्या आजचे दर

दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.

कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.

हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.

बंगळुरू: पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.

तिरुअनंतपुरम: पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.

भुवनेश्वर: पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.

चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.

लखनौ : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.

नोएडा: पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.

जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.

पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

गुरुग्राम: 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती

दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मंगळवारी WTI क्रूड प्रति बॅरल $ 78.36 पर्यंत घसरले असून ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 82.35 च्या जवळ गेले आहे. जुलै 2008 नंतर या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $140 वर पोहोचल्या तरीही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली नाही.

उत्पादन शुल्कात कपात

केंद्र सरकारकडून यापूर्वी 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या आजच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली होती. तर पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केली आहे.

त्यानंतर पेट्रोल तसेच डिझेलच्या दरात घट करण्यात आली होती. देशभरात यानंतर डिझेल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारकडूनही व्हॅटमध्ये कपात करण्यात आली .