PM Kisan Samman Nidhi : ‘या’ शेतकऱ्यांना धक्का! मिळणार नाही 14 वा हप्ता, यादीत तुमचे तर नाव नाही ना? लगेच पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने आतापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. याचा फायदा देशातील करोडो शेतकऱ्यांना झाला आहे. अशातच आता या योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे.

परंतु, 14 वा हप्ता मिळण्यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. त्यांना आता पुढील हप्त्याचा फायदा घेता येणार नाही. नवीन नियम काय आहेत? कोणत्या शेतकऱ्यांना 14 व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे? यांसारखी सर्व माहिती जाणून घ्या फक्त एकाच क्लिकवर.

ही कामे पूर्ण असतील तर पैसे येणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता मिळविण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी, आधार लिकींग तसेच जमीनीचे कागदपत्रांची नोंदणी करणे खूप गरजेचे आहे. आता ही तिन्ही कामे तुमची पूर्ण असतील तरच तुम्हाला सन्मान निधीचे पैसे खात्यात जमा होणार आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या तिन्ही गोष्टी पूर्ण करणे सोपे आहे. ई-केवायसीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या जनसेवा केंद्राशी संपर्क साधता येईल. तर आधार लिकींगसाठी, तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागणार आहे. तसेच जमीनीचे कागदपत्रांची नोंदणीसाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याचा सल्ला घेता येईल.

तपासा हा संदेश

सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या स्टेटसमध्ये PM किसानसाठी मेसेज तपासावा लागणार आहे. जर शेतकरी पीएम किसानच्या साइटला भेट देऊन त्यांची स्थिती तपासत असल्यास, तर सर्वात अगोदर त्यांना त्यांचे ई-केवायसी आणि जमिनीचा तपशील पूर्ण आहे का ते तपासावे लागणार आहे. जर ते योजनेसाठी पात्र आहे तर त्यांच्या सर्वांसमोर स्टेटसमध्ये ‘होय’ असे लिहिले असेल. म्हणजे याचा असा अर्थ की तुम्ही हप्त्यासाठी पात्र आहात. पण जर ‘नाही’ दिसले तर त्याचा अर्थ असा आहे की तुमचा हप्ता थांबू शकतो.

अशी पहा स्थिती

  • जर तुम्हालाही तुमच्या पीएम किसान खात्याची स्थिती तपासायची असल्यास तुम्हाला आधी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत.
  • सर्वात अगोदर तुम्हाला http://pmkisan.gov.in पोर्टलवर जावे लागणार आहे.
  • ‘लाभार्थी स्थिती’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • येथे योजनेचा मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकावा लागणार आहे.
  • आता तुम्ही स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाकताच तुमचे स्टेटस तुमच्या समोर येईल.
  • जर तुम्ही E-KYC, पात्रता आणि जमीनीचे कागदपत्रांची नोंदणीच्या समोर होय लिहिले असेल, तर तुम्हाला PM किसान योजनेचा पुढील हप्ता मिळेल.
  • जर ई-केवायसी, पात्रता आणि जमीनीचे कागदपत्रांची नोंदणीच्या पुढे नाही लिहिले असेल, तर पीएम किसानचा तुमचा पुढील हप्ता अडकू शकतो.