शेजाऱ्यांमधील वाद सोडविण्यासाठी आलेल्या पोलिसांनी संशयास्पद टेम्पो पकडला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- दोन शेजार्‍यांमध्ये रात्रीच्यावेळी वाद झाल्याने ते सोडवण्यासाठी आलेल्या श्रीरामपूर शहर पोलिसांनी संशयास्पद टेम्पो पकडला आहे.

या टेम्पो मध्ये दूध भेसळीसाठी वापरल्या जाणार्‍या 59 भुकटीची पाकीटे भरलेली आढळून आली. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील एका ठिकाणी दोन शेजार्‍यांमध्ये रात्रीच्यावेळी वाद झाल्याने एकाने वादाची माहिती पोलिसांना कळविली.

त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र याच वेळी तेथून पोलिसांनी एका टेम्पोसह 25 किलो वजनाच्या दूध भेसळीसाठी वापरल्या जाणार्‍या संशयावरून 59 भुकटीची पाकीटे ताब्यात घेतली.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाला रात्रीच माहिती देत पोलीस ठाण्यात नोंद केली.

याबाबत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी अन्न आणि औषध तपासणी पथकाकडून तत्परता दाखवली नसल्याने सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला नव्हता.

पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली असून अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदतीने गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी दिली.