Health Tips In Marathi : हृदय निरोगी ठेवायचे आहे ? वाचा ही महत्वाची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021, Health Tips In Marathi :- जीवनात निगेटिव्ह फीलिंग्स वा एखाद्याला गमावण्याचा एपिसोड झाल्यास निगेटिव्ह इमोशन्स बनतात. या हृदयाची धडधड व ब्लडप्रेशर वाढतो.

हृदय आणि मेंदू दोन्ही वेगवेगळे आहेत. मेंदू विचार करतो तर हृदय धडधडत असते. इमोशन्स मेंदूत येतात आणि तिथूनच ते हृदयाशी कनेक्ट होतात. हृदयाला भिडले, हदय दुखावले, हृदय तुटले असे म्हणणे चूक आहे. मेंदू विचार करतो व त्यातून निघणारे हार्मोन्स हृदयावर परिणाम करतात.

राग आणि अहंकार आल्यास सिंपेथेटिकन नर्व्हज सिस्टीम ऑक्टिव्हेट होत असते. यातून निघणारे वेगवेगळे हार्मोन्स हृदयाचे आरोग्य बिघडवतात. या मुळे हृदयाची धडधड वाढण्यास सुरुवात होते.

मेंदू टेशनमध्ये येतो तर जेव्हा आपण आनंदी राहतो तेव्हा पॅश स्टिमॅटिक नर्व्हज सिस्टीम ऍक्टिवाटे होते. जी टेंशन कमी करणारे हार्मोन्स रिलीज करते. यामुळे जेव्हा एखाद्याविषयी प्रेम वाटते तेव्हा त्यातून निघणारे हार्मोन्स आपल्या शरीराला एनर्जी देत असतात.

० ब्रेननंतर हार्टमध्ये असतात सर्वांत जास्त न्यूरॉन्स : –

यामध्ये योगा आणि मेडिटेशनप्रमाणे सीक्रेट हार्मोन्स रिलीज होत असतात. हे हृदयाची धडधड नियंत्रित करतात. त्यामुळे असे मानले जाते की, प्रेम करणे योगा आणि मेडिटेशन प्रमाणे असते. शास्त्रात याचे पुरावे मिळाले आहेत की, ब्रेननंतर न्यूरॉन्स हृदय, आतडी आणि त्वचेत आढळतात.

यामुळेच पॉझिटिव्ह असताना याचा परिणाम हृदयावर होत असतो. टेशन आल्यास आतड्यांचे न्यूरॉन्स गडबडून व्यक्तीला वारंवार लूज मोशन होते. हार्ट ट्रान्सप्लांट केल्यास रिसिपिएंटमध्ये डोनरचा स्वभाव व त्याची वैशिष्ट्ये ट्रान्सप्लांट होतात.

० हार्ट डिसीजपासून बाचवील पॉझिटिव्ह इमोशन्स व हग : –

जेव्हा आपण एखाद्याला हग वा टच करतो तेव्हा पॉझिटिव्ह इमोशन्स रिलीज होतात. यामध्ये मेंटल व सायकॉलॉजिकल हेल्थ सामील असल्यामुळे हे कॉर्डिओ व्हॅस्क्युलर डिसीज पासून वाचवतात. पॉझिटिव्ह इमोशन्समुळे शरीरात न्यूरोबायोलॉजिकल हार्मोन्स बाहेर पडतात जे हार्टला हेल्दी ठेवतात.

धडधड नियंत्रित राहते. अमेरिकेच्या कॉर्डियोव्हस्क्युलर डिसीजसंबंधित जर्नल सर्क्युलेशनमध्ये एका स्टडीत हे प्रकाशित केले आहे. कोलेस्टेरॉल लेव्हल सामान्य राखून हार्ट अँटॅक पासून वाचता येते.

तसेच ग्लुकोज लेव्हल ही मेंटेन ठेवते. जीवनात निगेटिव्ह फीलींग्ज वा एखाद्याला गमावण्याचा एपिसोड झाल्यास निगेटिव्ह इमोशन्स बनतात. या हृदयाची धडधड ब ब्लडप्रेशर वाढवतात. तसेच लुज मोशन व पोटदुखीसारखे प्रॉब्लेम होऊ शकतात.

० गॉसिप आणि आनंदी राहिल्यामुळे मधुमेह राहील नियंत्रित : –

मित्रांशी व पार्टनरशी गॉसिप केल्यामुळे वा इतर कारणांमुळे एक्साइटमेंट येते. एक्साइटमेंट मुळे कॉर्टिसॉल सारखे हार्मोन्स रिलीज होतात. एक्साइटमेंट वाढण्या सोबत या हार्मोन्सची सीक्रेशन लेव्हल ही वाढते.

वास्तविक असे मानले जाते की, दीर्घकाळपर्यंत या हार्मोनची पातळी वाढल्यामुळे डायबिटीस होण्याची शक्‍यता असते. असे सर्वांसोबत होते असे नाही. हे हार्मोन्स थोड्या वेळानंतर सामान्य होतात.

तसेच तणावात राहिल्यामुळे डायबिटीस वाढतो. आनंदी राहिल्यामुळे शुगर लेव्हल उत्तम प्रकारे मॅनेज करता येऊ शकते. डायबिटीस वाढण्याचे चान्सेस कमी होत असतात.