अहमदनगर जिल्ह्यात लग्नाआधीची सुहागरात नवरदेवाला पडली महागात ! केलं असं काही कि…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून एक धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे, मूळच्या नाशिक जिल्ह्यातील एका नवरदेवाला त्याचे एक चुकीचे कृत्य चांगलेच महागात पडले आहे.

अकोले शहरातील घटना :- लग्नाआधीच सुहागरात करन्याची मागणी करणाऱ्या या नवरदेवाला आता मात्र पोलिसांच्या चौकशीत आणि कोठडीत जावे लागणार आहे. हि घटना नगर जिल्ह्यातील अकोले शहरात घडली आहे.

ऑनलाईन साईट वर झाली होती ओळख…

एक घटस्फोट झालेल्या महिलेला लग्न करण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी ऑनलाईन विवाह नोंदणी अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन केले या महिलेशी नाशिक येथील सुधाकर पगारे याच्यासोबत चर्चा झाली. दोघांमध्ये एकाने मध्यस्ती करीत दोन्ही कुटुंबांना लग्न ठरविण्याचा विचार पक्का केला.

22 जून 2021 रोजी लग्नाचा मुहूर्त !

यांनी एकमेकांची पसंती करण्यासाठी बैठक देखील घेतली आणि दोघांची मने जुळली असता लग्नाची तारीख देखील ठरली. 22 जून 2021 रोजी नाशिक येथे लग्नाचा मुहूर्त ठरला होता.

चार दिवसांचा कालावधी विघ्न..

पण, सुधाकर दम नव्हता त्यांनी 18 जून 2021 रोजी नाशिकहून थेट अकोलेत आपले सासर गाठले आणि आपल्या भावी पत्नीशी चर्चा सुरू केली. मात्र, अवघ्या चार दिवसांचा कालावधी त्यांना लग्नाचे विघ्न निर्माण करुन गेला.

लग्नास नकार देत तोडला संपर्क !

नवरदेव लग्नापुर्वीच सासरवाडीला आला आणि नवरीच्या रुममध्ये घुसून तिच्याशी अंगलट करु लागला. मात्र, साहेब.! लग्न तर होऊद्या, असे म्हणत नवरीने विरोध केला असता हे साहेब फारच तापले आणि तेथून अपमाणित होऊन चालते झाले. त्यानंतर मात्र, लग्नास नकार देऊन त्यांनी संपर्क तोडून टाकला.

विनयभंग आणि लग्नाचे आमिष दाखविल्याचा गुन्हा

हा प्रकार पीडित महिलेस खटकला आणि तिने थेट पोलीस ठाणे गाठत संबंधित व्यक्तीवर विनयभंग आणि लग्नाचे आमिष दाखविल्याचा गुन्हा ठोकला आहे. त्यामुळे, आता एकीकडे कपाळाला मंडवळ्या बांधणार्‍या नवरोबाच्या हाताला बेड्या ठोकाव्या लागणार आहेत .

अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न

ज्या दिवशी पगारे आला तेव्हा त्याने घराचा पाहुनचार घेतला आणि आपल्या होणार्‍या पत्नीच्या बेडरुमध्ये जाऊन नको नको ते अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला. महिलेने याला विरोध केला असता त्यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली.

निर्भिडपणे पुढे येत गुन्हा दाखल

पगारे तेथून चालता झाला. सगळे काही बोलणे होऊन देखील, लग्नाची तारीख ठरुन देखील याने लग्न करण्यास नकार दिला. ते कशाहुन तर लग्नापुर्वी याच्या म्हणण्यानुसार वागली नाही, म्हणून.

त्यामुळे, पीडित महिलेस त्याचा राग आला. या प्रकारानंतर मानसिक दृष्ट्या खचलेल्या महिलेने अकोले पोलीस ठाण्यात अगदी निर्भिडपणे पुढे येत गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24