कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा रुग्णालयास विविध साहित्याची भेट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- कोरोना महामारीत सर्वसामान्य व गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेल्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कर्मचारींसाठी क्राय व वंचित विकास संस्थेच्या वतीने मास्क, थर्मलगन, साबण, हॅण्डवॉश, लिक्विड, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोजची भेट देण्यात आली.

सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेने वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला.

संस्थेच्या वतीने 4 हजार मास्क, 24 लीटर लिक्विड हॅण्डवॉश, चारशे डेटॉल साबण, 4 थर्मल गन, 10 लीटर सॅनिटायझरचे साहित्य जिल्हा रुग्णालयाचे आरएमओ डॉ.घुगे व औषध निर्माण अधिकारी मृणाल कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव राजेंद्र काळे, नंदा साळवे, सुदीप पडवळ आदी उपस्थित होते. या कोरोना महामारीत जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर,

कर्मचारी व रुग्णांना हे साहित्य उपयोगी पडणार असून, सामाजिक जाणीव ठेऊन ही मदत देण्यात आल्याचे राजेंद्र काळे यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24