Ration Alert : सावधान ! मोफत रेशनच्या नावाखाली तुमचीही होऊ शकते फसवणुक, त्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Alert : आधार कार्ड तसेच मतदान ओळखपत्राप्रमाणेच रेशन कार्ड देखील एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. जर तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर रेशन कार्ड खूपच उपयोगी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरीब कुटुंबांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी याचा मोठा फायदा होतो.

अनेकजण मोफत रेशनचा लाभ घेत असतात. परंतु तुमची आता मोफत रेशनच्या नावाखाली फसवणुक होऊ शकते, त्यामुळे वेळीच सावध होणे खूप गरजेचे आहे. तुम्ही तुमची फसवणूक टाळू शकता. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.

विसरू नका या गोष्टी

बनावट कॉल घेणे टाळा

हे लक्षात ठेवा की तुम्हाला बनावट कॉल येऊ शकतात. कारण सध्या मोफत रेशनच्या नावाखाली बनावट कॉल करून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. सरकार किंवा कोणताही सरकारी अधिकारी तुम्हाला फोन करून तुमची गोपनीय माहिती विचारू शकत नाही.

बँकिंग माहिती शेअर करणे टाळा

जर तुम्हाला मोफत रेशनसाठी कॉल आला असेल तर अशा कॉलवर चुकूनही बँकिंग माहिती कधीही शेअर करू नका. कारण हे लोक बनावट असण्याची शक्यता असते आणि तुमची फसवणूक होऊ शकते. याबाबत फूड अँड लॉजिस्टिक्स विभागाकडून स्पष्टपणे सांगितले आहे की ते कधीही कॉलद्वारे तुमची बँकिंग माहिती विचारत नाहीत.

ई-केवायसी टाळा

सध्या मोफत रेशनसाठी ई-केवायसी करून देण्याच्या नावाखाली फसवणूक होत आहे. फसवणूक करणारे लोकांना कॉल किंवा मेसेज करून ई-केवायसी करण्यास सांगत आहे. त्यामुळे तुम्हाला अशा कॉल्स किंवा मेसेजपासून दूर राहावे लागणार आहे. फक्त KYC साठी तुमच्या रेशन डीलरशी किंवा शिधावाटप कार्यालयाशी संपर्क साधा.

गोपनीय माहिती शेअर करू नका

तुम्हाला एक गोष्ट माहित असणे खूप गरजेचे आहे की अन्न आणि रसद विभाग तुम्हाला कधीही कॉल करून कोणतेही कागदपत्र विचारू शकत नाही. जसे- आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, रेशनकार्ड क्रमांक आणि बँकिंग माहिती इत्यादी विचारत नाही. त्यामुळे जर कोणी तुम्हाला या कॉलवर विचारले तर ते बनावट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा कॉल्सपासून सावध राहणे गरजेचे आहे.