RBI News : ग्राहकांनो.. 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी ओळखपत्राची किंवा आयडीची गरज आहे का? काय सांगतो नियम जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI News : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून 19 मे रोजी अचानक दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना एकच धक्का बसला आहे. दरम्यान ज्या नागरिकांकडे या नोटा नाहीत त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही.

परंतु ज्या नागरिकांकडे या नोटा आहेत त्यांना नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत. जर तुम्हाला या नोटा बदलायच्या असतील तर प्रक्रिया अतिशय सोपी आहे. तुम्ही आता तुमच्या जवळच्या बँका आणि व्यावसायिक मध्यस्थी केंद्रात जाऊन या नोटा बदलता येतील.

ओळखपत्र स्वीकारण्यात येणार नाही

स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. यात त्यांनी असे म्हटले आहे की, जर तुम्हाला 2000 रुपयांची नोट बदलायची असेल तर त्यासाठी कोणत्याही व्यक्तीला पुरावा द्यावा लागणार नाही किंवा त्यांना कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. तुम्ही आता 20,000 रुपयांपर्यंतच्या नोटा एकाच वेळी सहज बदलू शकता.

23 मे ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान, ज्या नागरिकांकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत त्यांना इतर मूल्यांच्या नोटांसाठी बदलता येतील. तसेच 2000 रुपयांची नोट बँक खात्यात जमा करण्यासाठी तुम्हाला कोणताही अतिरिक्त फॉर्म भरावा लागत नाही. परंतु, हे लक्षात ठेवा की ठेवीबाबत बँकेचे नियम काहीही असले तरी ते तुम्हाला अनिवार्य आहे.

या ठिकाणी बदला 2000 रुपयांच्या नोटा

ग्रामीण भागात राहत असणाऱ्या लोकांना बिझनेस करस्पॉन्डंट सेंटरला भेट देऊन 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतात. परंतु हे लक्षात घ्या की या केंद्रावर केवळ 4000 रुपयांपर्यंतच्या नोटा बदलता येणार आहे. बिझनेस करस्पॉन्डंट बँकेसारखे काम करत असतात ते गावकऱ्यांना बँक खाती उघडण्यास मदत करतात.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कार्यालयात बदलू शकतात नोटा

संपूर्ण देशभरात RBI ची 31 ठिकाणी प्रादेशिक कार्यालये असून 2000 रुपयांच्या नोटा अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, जम्मू, कानपूर तसेच कोलकाता, लखनौ, मुंबई आणि नागपूर येथे जारी करण्यात येतात.

तसेच नवी दिल्ली, दिल्ली, पाटणा आणि तिरुअनंतपुरममध्ये नोटा बदलू शकतात. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ देणे बंद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याचाच असा अर्थ की बँकांकडून आता ग्राहकांना 2000 च्या नव्या नोटा देण्यात येणार नाहीत.

RBI कडून ‘क्लीन नोट पॉलिसी’ अंतर्गत 2000 रुपयांची नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धोरणांतर्गत RBI हळूहळू बाजारातून 2000 च्या नोटा काढून टाकल्या जातील.