Jio Best Plans : करा 200 रुपयांचा रिचार्ज, मिळवा फ्री OTT ॲप्ससह अनेक सुविधा

Jio Best Plans : सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्ज महाग केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना चांगला फटका बसत आहे. तरीही कंपन्या काही स्वस्त रिचार्ज लाँच करते याचा फायदा ग्राहकांना मिळतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

असेच काही प्लॅन रिलायन्स जिओने लाँच केले आहेत यामध्ये ग्राहकांना मोफत OTT ॲप्ससह अनेक सुविधा मिळत आहेत, हे प्लॅन कोणते आहेत पाहुयात यादी.

1. 119 रुपयांचा प्लॅन

Advertisement

लिस्टमधील पहिला प्लॅन हा 119 रुपयांचा असून यामध्ये 14 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये दिवसाला 1.5GB डेटा त्याशिवाय अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 300 एसएमएसचा फायदा घेता येतो. जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउड आणि जिओ सिनेमा सारख्या इतर जिओ ॲप्सचे मोफत सब्सक्रिप्शन मिळते.

2. 149 रुपयांचा प्लॅन

लिस्टमधील दुसरा प्लॅन 149 रुपयांचा असून यामध्ये 20 दिवसांच्या वैधता मिळते. या प्लॅनमध्ये दिवसाला 1GB डेटा, या प्लॅनमध्ये दिवसाला व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. त्याचबरोबर, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउड आणि जिओ सिनेमा सारख्या इतर जिओ ॲप्सचे मोफत सब्सक्रिप्शन मिळते

Advertisement

3. 179 रुपयांचा प्लॅन

लिस्टमधील तिसरा प्लॅन 179 रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना एकूण 24 दिवसांची वैधता मिळते. दिवसाला 1GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. त्याचबरोबर याही प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउड आणि जिओ सिनेमा सारख्या इतर जिओ ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शनचा लाभ घेता येतो.

4. 199 रुपयांचा प्लॅन

Advertisement

लिस्टमधील शेवटचा प्लॅन हा 199 रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना 23 दिवसांची वैधता मिळते. दिवसाला 1.5GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. त्याचबरोबर, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउड आणि जिओ सिनेमा सारख्या इतर जिओ ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.