Redmi Note 12 Pro : लवकरच रेडमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन गाजवणार मार्केट, मिळेल 200MP चा जबरदस्त कॅमेरा

Redmi Note 12 Pro : सध्या रेडमी ही स्मार्टफोन कंपनी जगातील सर्वात स्वस्त आणि वेगवान चार्जिंग फोन लाँच करत आहे. भारतात लवकरच रेडमी आपला आगामी स्मार्टफोन Redmi Note 12 Pro लाँच करणार आहे.

कंपनीने हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. आता ही कंपनी भारतात आपला स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारात धुमाकूळ घालेल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

किंमत

हा स्मार्टफोन नुकताच चीनी बाजारात लॉन्च केला आहे. या फोनच्या 6 जीबी रॅमसह 128 जीबी बेस व्हेरिएंटची किंमत 1,699 चीनी युआन, अंदाजे 20,000 रुपये ठेवली आहे. भारतात Xiaomi आपला नवीन फोन 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर करू शकते. फोन चायनीज वेरिएंट प्रमाणेच शिमर ग्रीन, टाइम ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केले जाऊ शकते.

स्पेसिफिकेशन

कंपनीने आपल्या आगामी फोनचे पोस्टर जारी केले आहे.या स्मार्टफोनचे काही फीचर्स Flipkart वर लिस्ट केले आहेत.पोस्टरनुसार, यामध्ये 200-मेगापिक्सेल कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंगसह सुसज्ज असेल. तसेच  फोनमध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह एक डिस्प्ले उपलब्ध असेल. तसेच फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्सची माहितीही लीक झाली आहे. यामध्ये MediaTek Dimensity 1080 प्रोसेसर दिला जाईल.

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर यासोबत एक ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये 200-मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरासह ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्ट केला जाईल.

त्याशिवाय या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळेल. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये ग्राहकांना 5000 mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग मिळेल.