Rishabh Pant car accident : ऋषभ पंत थोडक्यात बचावला, मर्सिडीज जळून राख; जाणून घ्या कधी आणि कसा झाला अपघात; पहा फोटो

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rishabh Pant car accident : भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. पंतला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र गाडीने पेट घेतल्याने गाडी जाळून खाक झाली आहे. मात्र अपघात कसा आणि कुठे झाला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा शुक्रवारी सकाळी अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुभाजकाला धडकल्याने क्रिकेटपटूची मर्सिडीज कार पूर्णपणे जळून खाक झाली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीहून उत्तराखंडमधील रुरकीला जाणारी ऋषभ पंतची मर्सिडीज कार आज (शुक्रवारी) पहाटे 5.15 वाजता नरसन सीमेवर रेलिंगला धडकली. अपघातानंतर कारने पेट घेतला. सुदैवाने वाटसरूंनी विंड स्क्रीन तोडून पंत यांना गाडीतून बाहेर काढले. त्यावेळी ते कारमध्ये एकटेच होते.

जखमी क्रिकेटपटूला त्वरीत रुरकीच्या सक्षम रुग्णालयात नेण्यात आले. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, क्रिकेटरच्या शरीरात फारशी जखम नाही, पण एका पायाला फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे. त्याला आता डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये चांगल्या उपचारासाठी नेण्यात आले आहे.

पंत स्वतः चालवत होता कार

ऋषभ पंतने सांगितले की, पहाटे कार चालवताना झोप लागली होती आणि काही सेकंदातच कार अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली आणि अपघात झाला.

सीएम धामी यांनी माहिती घेतली

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अपघातात जखमी क्रिकेटपटू ऋषभ पंतची माहिती अधिकार्‍यांकडून घेतली आहे. यासोबतच त्यांच्या उपचारासाठी शक्य ती सर्व व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उत्तराखंड सरकार करणार उपचाराचा खर्च

ऋषभ पंतला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देताना सीएम धामी म्हणाले की, त्याच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलेल. एअर अॅम्ब्युलन्सची गरज भासल्यास त्याचीही व्यवस्था करावी.