Samsung Galaxy M53 5G : मस्तच.. पहिल्यांदाच खूप मोठ्या सवलतीत खरेदी करता येणार Galaxy M53 5G, होईल हजारोंची बचत!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Galaxy M53 5G : सॅमसंगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता कंपनीच्या Galaxy M53 5G या स्मार्टफोनवर पहिल्यांदाच 10,000 रुपयांपेक्षा सवलत मिळत आहे. त्यामुळे अशी संधी गमावू नका.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीने हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी लाँच केला आहे. लाँच झाल्यापासून सर्वात जास्त विक्री या फोनने केली आहे. तुमच्याकडे आता हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. अशी भन्नाट संधी तुम्हाला फ्लिपकार्ट आणि Amazon वर मिळत आहे.

जाणून घ्या ऑफर आणि सवलत

सध्या फ्लिपकार्ट सॅमसंगच्या या लोकप्रिय स्मार्टफोनवर 29% सवलत देत आहे, तर Amazon कडून 20% सवलत दिली जात आहे. या ऑफरमुळे Flipkart वर या स्मार्टफोनची किंमत 10,404 रुपयांनी कमी झाली असून तुम्हाला जुन्या डिव्हाइसची देवाणघेवाण करून नवीन फोन घ्यायचा असल्यास तुमच्यासाठी हा फोन Amazon वरून खरेदी करणे फायद्याचे होईल, कारण सध्या फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफर देण्यात येत नाही.

कंपनीचा Galaxy M53 हा 8GB + 128GB व्हेरिएंट Amazon वर सवलतीनंतर 27,999 रुपयांना खरेदी करता येईल. समजा तुम्ही येस बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला 1500 रुपयांची सवलत मिळेल, तर एक्सचेंज ऑफर अंतर्गत 25,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तसेच फ्लिपकार्टवर हा फोन 24,595 खरेदी करता येईल. इतकेच नाही तर जर तुम्ही कोटकच्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट केले तर तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळेल.

जाणून घ्या Samsung Galaxy M53 ची खासियत

कंपनी या फोनमध्ये 120HZ च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देत आहे. हे MediaTek Dimensity 900 चिपसेटद्वारे समर्थित असून हा फोन Android 12-आधारित OneUI 5.1 आउट-ऑफ-द-बॉक्ससह येतो.

कंपनीच्या क्वाड रियर कॅमेरा सेटअप स्मार्टफोनमध्ये 108MP प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा, 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो सेन्सरसह खरेदी करता येत आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे.