Samsung Galaxy S22 FE : ‘या’ दिवशी लाँच होणार सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन, मिळणार 108MP चा कॅमेरा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Galaxy S22 FE : सॅमसंग पुढच्या वर्षी Galaxy S23 सीरिज लाँच करण्याच्या तयारीत आहे . रिपोर्ट्सनुसार, ही कंपनी सॅमसंग गॅलेक्सी S22 चे फॅन एडिशन सादर करेल.

1 फेब्रुवारी 2023 रोजी या स्मार्टफोनचे यूएसमध्ये अनावरण केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये वापरकर्त्यांना नवीन प्रोसेसर आणि 108MP चा जबरदस्त कॅमेरा मिळू शकतो.

Tipster @OreXda ने सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार, सॅमसंग नवीन डिव्हाइस राऊंडवर Samsung Galaxy S22 FE लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन Samsung Galaxy S21 FE मध्ये अपग्रेड म्हणून सादर केला जाणार आहे. या फोनसोबत, कंपनी जानेवारी 2023 मध्ये Galaxy Buds 2 सादर करणार आहे.

संभाव्य स्पेसिफिकेशन

लीक्सनुसार, या फोनला 4nm Exynos 2300 चिपसेटचा सपोर्ट मिळेल. कंपनी या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात मोठे बदल करणार आहे.यामध्ये 108-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा असणार आहे. मागील फोनसोबत 12-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर उपलब्ध आहे.

Samsung Galaxy S23 Ultra

कंपनी लवकरच आपली फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Samsung Galaxy S23 लॉन्च करणार आहे. या सीरीज अंतर्गत, Samsung Galaxy S23 Ultra हा टॉप व्हेरिएंट म्हणून सादर केला जाणार आहे. लीक्सनुसार, हा फोन 200 मेगापिक्सेल कॅमेरासह ISOCELL HP2 सेन्सरने सुसज्ज असू शकतो.

फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर, 5,000mAh बॅटरीसह दिला जाण्याची शक्यता आहे.यात 10 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स आणि 10x ऑप्टिकल झूमचा सपोर्ट मिळू शकतो. तसेच या फोनमध्ये 60fps वर 8K व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची सुविधाही उपलब्ध असल्याचे बोलले जात आहे.