Sathi Portal Update : झटक्यात समजेल बियाणे खरे आहे की खोटे, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sathi Portal Update : भारत सरकार शेतकऱ्यांसाठी सतत वेगवगळ्या योजना राबवत असते. याचा फायदा देशातील लाखो शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारे साथी पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशन लाँच केले आहे.

या मार्फत तुम्ही आता सहज बियाणे बनावट आहे की नाही ते ओळखू शकता. सध्या बनावट बियाणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे हे नुकसान थांबवण्यासाठी सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर असे म्हणाले की, भारत सरकार वेगवेगळ्या योजना आणि कार्यक्रमांद्वारे कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने आणि अडचणींवर मात करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. साथी पोर्टल हे त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून जेव्हा त्याचा वापर सुरू होईल, तेव्हा ते कृषी क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल ठरू शकते.

वाढत आहेत भारताकडून अपेक्षा

याबाबत नरेंद्र सिंह तोमर बोलताना असेही म्हणाले की, “अगोदर कृषी क्षेत्रातील आपल्या गरजा पूर्ण करणे हे उद्दिष्ट होते, मात्र सध्या भारताकडून जगाच्या अपेक्षाही वाढल्या जात आहेत. त्यामुळे शेती, हवामान बदल इत्यादी सर्व आव्हानांना तोंड देत असताना जगाला मदत करणे ही जबाबदारी आहे.

दर्जेदार किंवा बनावट बियाणे शेतीच्या वाढीवर परिणाम करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होतेच, तर शिवाय देशाच्या कृषी उत्पादनातही मोठा फरक पडत आहे. बनावट बियाणांची बाजारपेठ कोलमडून दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात यावी, असे वेळोवेळी समोर येत आहे, त्यासाठी साथी पोर्टल सुरू केले आहे.