भन्नाट ! जेवढे सोने घ्याल तेवढी चांदी फ्री ; आजच्या दिवसचं ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- सोने हा आज भारतीय लोकांमधील गुंतवणूकीचा सर्वाधिक पसंत असणारा मार्ग आहे. सोन्यातील गुंतवणूक वेगाने वाढली आहे. उत्सवाचा काळ असो किंवा पारंपारिक उत्सव असो, या पिवळ्या धातूचे प्रत्येक घरात एक विशेष स्थान आहे.

दसरा असो, धनत्रयोदशी असो वा अक्षय्य तृतीया, सोनं खरेदीसाठी हे विशेष निमित्तच म्हणा. लक्ष्मीपूजन असो वा घरच्या लक्ष्मीची मागणी, सोन्याशिवाय हे सण अपूर्ण आहेत.परंतु सोन्याच्या किमती प्रचंड असल्याने बऱ्याचदा अनेकांना अडचण देखील येते. परंतु एका ठिकाणी जेवढ्या वजनाचे सोन्याचे दागिने खरेदी केले, तेवढ्याच वजनाची शुद्ध चांदी ग्राहकांना मोफत दिली जात आहे.

 कुठे ? का? :- औरंगाबाद येथील शहरातील काल्डा कॉर्नर येथील पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या शाखेचा आज पहिला वर्धापन दिन असल्याने त्यांनी विशेष ऑफर ठेवली आहे. जेवढ्या वजनाचे सोन्याचे दागिने खरेदी केले, तेवढ्याच वजनाची शुद्ध चांदी ग्राहकांना मोफत दिली जात आहे.

ऑफर 31 ऑगस्टपर्यंत :- ही ऑफर 31 ऑगस्टपर्यंतच असेल. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत ग्राहकांना दालनात सेवा दिली जात आहे.

 सोने खरेदी करताना ‘हे’ लक्षात ठेवा

सराफाने सांगितलेली सोन्याची किंमत त्याच्या गुणवत्तेवर ठरते. उदाहरणार्थ, जर २४ कॅरेट सोन्याची किंमत १० ग्रॅमसाठी ३२ हजार रुपये असेल, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत त्यापेक्षा कमी असेल, म्हणजे साधारण २९,३०० ते २९,५०० रुपये प्रति १० ग्रॅम असेल. म्हणून तुम्ही जेव्हा दागिन्यांची निवड करता, तेव्हा त्या गुणवत्तेच्या सोन्याची बाजारपेठेतील किंमत तपासून पहा.

– अलीकडे दागिन्यांमध्ये हिरे, सेमी-प्रेसिअस खडे आणि कृत्रिम रंग दिलेले खडे जडवूनच मिळतात. हे खडेसुद्धा तुम्ही खरेदी करणार असलेल्या दागिन्यांचाच हिस्सा असतो. सराफाने सोन्याची आणि जडवलेल्या खड्यांची किंमत वेगवेगळी दर्शविणे महत्त्वाचे असते आणि त्यानुसार घडणावळ आणि कर यांचा हिशेब केला गेला पाहिजे.

काही सराफ दागिन्यांचे एकूण वजन हे वास्तविक वजन म्हणून लक्षात घेतात आणि त्यानुसार किंमत लावतात. अशा वेळी चुकीच्या हिशोबामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. उदाहरणार्थ, जर सोन्याचे वजन (प्रतिग्रॅम ३ हजार) २० ग्रॅम असेल आणि खड्याचे वजन (प्रतिग्रॅम २० रुपये) १ ग्रॅम असेल, तर सराफ तुम्हाला ३ हजार x २१ ग्रॅम = ६३ हजार रुपये किंमत लावतो. पण याचा योग्य हिशोब असा असेल

– रु. ३ हजार x २० ग्रॅम + (रु.२० x १ ग्रॅम) = ६०,०२० (लागू असलेल्या दरानुसार जीएसटी अतिरिक्त). म्हणून बिलाची पद्धत तपासून तुम्ही सहजपणे रु.२,९८० रुपये वाचवू शकता.