गद्दार म्हणा, टींगल करा, आम्ही कामातून उत्तर देऊ; बच्चू कडूंचं वक्तव्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : राज्यात शिवसेना सरकार स्थापन झाले. शिवसेनेत मोठी फूट पडली यावरुन शिवसेनेमध्ये आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्णी होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांना गद्दार म्हंटलं गेलं. यावरुन आता प्रहार संघटनेते प्रमुख बच्चू कडू यांनी उत्तर दिले आहे.

ज्या लोकांनी मला निवडून दिले आहे, त्यांना न्याय देण्यासाठी लोकांनी मला गद्दार म्हंटले तरी चालेल. मला त्याची पर्वा नाही. गद्दारीला आम्ही कामातून उत्तर देऊ. शब्दातून नाही, असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे.

काम आणि सेवेतूनच राजकारण करत राहणार.  शिवसेनेतून एकनाथ शिंदेंसह अनेक आमदार फुटले असले तरीही उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे, असेही बच्चू कडू म्हणाले आहे.

बंडखोरी ही प्रत्येकामध्ये असते. बंडखोरी माणसाला जिवंत ठेवते. बंडखोर असणे महत्वाचे आहे. पहिले बंड ज्ञानेश्वरांनी केले. शरद पवारांनीही ३८ वर्षात ३८ आमदार पाडले. बंडखोर कोण नाही विधानसभा अध्यक्ष सुद्धा बंडखोर. बंडखोरांचा सन्मान देशात नव्हे तर जगात झाला आहे. बंडखोरीनंतर चांगली पद भेटली पाहिजेत. बजेटचं पद भेटलं पाहिजे. जलसंपदा जलसंधारण भेटले पाहिजे, असे लोक म्हणतात. आम्ही म्हंटले, सामाजिक न्याय मंत्रिपद द्या. जिथे अपंग आणि दलित आणि सामाजिक काम करता आले पाहिजे. नाही भेटले तरीही पुन्हा त्या ताकदीने लढण्याची ताकद बच्चू कडू आहे, असे बच्चू कडू म्हणाले आहेत.

दरम्यान, सामाजिक न्याय मंत्रिपद मिळण्याची इच्छा बच्चू कडूंनी बोलून दाखवली आहे. बच्चू कडूंना शिंदे सरकारमध्ये महत्वाचं मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता कडूंना नेमकं कोणतं मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.