अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची अखेर बदली झाली असून त्यांच्या जागेवर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयएएस अधिकारी भाग्यश्री बानायत यांची नियुक्ती झाली आहे.

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नागपूर येथील रेशीम उद्योग महामंडळाच्या संचालिकाभाग्यश्री बानायत यांची नियुक्ती शासनाने केली आहे.

दरम्यान, भाग्यश्री बानायत या 2012 च्या नागालँड येथील आयएएस अधिकारी असून याअगोदर नागपूर येथे रेशीम शेती महामंडळाच्या संचालकपदी त्या कार्यरत होत्या.

श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बदलीबाबत शिर्डीचा परिसरात नेहमीच दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा होत असे. संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे वेध याप्रमाणे अनेकांना लागलेले होते.

त्याचप्रमाणे नवीन अधिकारी संस्थांनला केव्हा येईल अशी चर्चा अनेक साईभक्त व नागरिकांमध्ये बोलली जात होती. अखेर राज्य शासनाने आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून

यामध्ये साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भाग्यश्री बानायत या थेट आयएएस असलेल्या महिला अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे.