SIM card port : चुटकीसरशी करता येईल मोबाइल नंबर पोर्ट, त्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SIM card port : भारतात बीएसएनएल (BSNL), रिलायन्स जिओ (Jio), एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया या टेलिकॉम कंपन्या (Telecom companies) ग्राहकांना सेवा (Service) पुरवतात. ग्राहकांना सिम कार्ड खरेदी करत असताना केवळ एकाची निवड करावी लागते.

परंतु, बऱ्याचदा ग्राहकांना एखाद्या कंपनीची (Company) सेवा आवडत नाही.त्यामुळे ते दुसऱ्या कंपनीचे सिम कार्ड खरेदी करून नंबर बदलतात. आता नंबर बदलणे खूप सोपे झाले आहे.

दूरसंचार कंपन्यांनी गेल्या वर्षी त्यांच्या योजनांच्या किमती वाढवल्या आहेत. त्यानंतर यूजर्स (Users) स्वत:साठी स्वस्त आणि चांगल्या योजना (Recharge Plan) शोधत आहेत.

जर तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरकडे (Telecom operators) तुमच्या गरजेनुसार प्लॅन नसेल किंवा तुम्ही तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरवर नाराज असाल तर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सिम पोर्ट घेऊ शकता. सिम पोर्ट मिळवणे खूप सोपे आहे, हे काम तुम्ही घरबसल्या चुटकीसरशी करू शकता.

सिम कार्ड कसे पोर्ट करायचे?

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईल नंबरवरून मेसेज पाठवा.
  • संदेशात PORT लिहून जागा द्या आणि नंतर तुमचा 10 अंकी मोबाईल क्रमांक टाका. उदाहरणार्थ, जर
  • तुमचा मोबाईल नंबर 9876543210 असेल, तर तुम्ही असा संदेश टाइप करू शकता – PORT 9876543210
  • आता 1900 वर मेसेज पाठवा.
  • मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल ज्यामध्ये एक कोड असेल.
  • या कोडसह, तुम्हाला ज्या कंपनीचे सिम पोर्ट करायचे आहे त्या कंपनीच्या जवळच्या स्टोअरमध्ये जा किंवा कोणत्याही मोबाइल किंवा टेलिकॉम शॉपमध्ये जा.
  • यानंतर दुकानदार तुमच्या मेसेजची पुष्टी करेल आणि ओळखपत्र घेतल्यानंतर तुम्हाला नवीन सिम कार्ड देईल.
  • नवीन सिम दिल्यानंतर, तुमचे नवीन सिम कार्ड केव्हा सक्रिय होईल हे दुकान मालक तुम्हाला सांगेल.