Smartphone Offer : 200MP कॅमेरा असणारा 50 हजारांचा फोन 15 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा, कुठे मिळत आहे संधी पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Smartphone Offer : जर तुम्ही 200MP कॅमेरा असणारा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याच्या विचारात असाल तर फ्लिपकार्टची सेल तुमच्यासाठी आहे. या सेलमध्ये अनेक लोकप्रिय स्मार्टफोन खरेदी करता येत आहे. परंतु हे लक्षात घ्या की ही सेल फक्त आजच्या दिवसासाठी असणार आहे.

त्यामुळे लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्या. या सेलमधून तुम्ही आता Infinix Zero Ultra हा फोन खरेदी करू शकता. ज्याची मूळ किंमत 49,999 रुपये इतकी आहे. परंतु यावर अनेक ऑफर मिळत आहेत त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल.

सध्या फ्लिपकार्टवर हॅलो समर डेज सेल सुरू असून यात अनेक इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन्सवर मोठ्या सवलती देण्यात येत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज सेलचा शेवटचा दिवस असून तुम्हाला Infinix Zero Ultra वर सवलतीचा लाभ घेण्याची शेवटची संधी आहे. वक्र डिस्प्ले, 8GB RAM, 180W फास्ट चार्जिंग आणि पॉवरफुल कॅमेरा सेटअपसह येणारा हा स्मार्टफोन मूळ किमतीच्या निम्म्याहून कमी किमतीत तुम्हाला विकत घेता येईल.

जाणून घ्या Infinix Zero Ultra ऑफर

भारतात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणाऱ्या Infinix Zero Ultra च्या व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये इतकी आहे. मात्र सेल दरम्यान, या फोनवर 34% ची सूट देण्यात येत असल्याने तो फ्लिपकार्टवर 32,999 मध्ये सूचीबद्ध करण्यात आला आहे. अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसह पेमेंट आणि ईएमआय व्यवहार किंवा फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसह ईएमआय व्यवहारांसाठी 10% सूट देण्यात येत आहे.

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेतला तर तुम्हाला, जुन्या फोनच्या एक्सचेंजच्या बाबतीत सर्वात मोठी सूट दिली जात आहे. तर जुन्या फोनच्या बदल्यात, तुम्हाला 26,250 रुपयांपर्यंत सूट मिळेल. परंतु या सवलतीचे मूल्य जुन्या फोनचे मॉडेल आणि स्थिती यावर अवलंबून असणार आहे. तसेच तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळत नसेल तरीही तुम्ही 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 200MP कॅमेरा असणारा हा फोन Coslite Silver आणि Genesis Noir कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.

जाणून घ्या स्पेसिफिकेशन

Infinix च्या प्रीमियम स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच फुल HD + 3D वक्र AMOLED डिस्प्ले देण्यात येत असून जो Gorilla Glass 3 द्वारे संरक्षित असणार आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 1000nits पीक ब्राइटनेस देते. यात Mediatek Dimensity 920 प्रोसेसरसह 8 GB RAM मिळत आहे. हे डिव्हाइस Android 12 वर आधारित सॉफ्टवेअर स्किनसह येते, ज्याला नवीनतम अपडेट देण्यात येत आहे.

कॅमेरा सेटअपमध्ये 13MP वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर 200MP प्राथमिक लेन्ससह असून वापरकर्त्यांसाठी सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा फोन 32MP फ्रंट कॅमेरासह येत आहे. क्वाड एलईडी फ्लॅशसह ड्युअल एलईडी फ्लॅश आणि मागील पॅनलवर फ्रंट कॅमेरा दिला जात आहे. हा 4500mAh बॅटरी 180W फास्ट चार्जिंगद्वारे समर्थित असून ज्याद्वारे हा फोन फक्त 4 मिनिटांत शून्य ते 50% चार्ज होतो तर 8 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो.