PM Kisan FPO Yojana : दिलासादायक! मोदी सरकार शेतकऱ्यांना देत आहे 15 लाख रुपये, असा करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan FPO Yojana : केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि त्यांच्यावर असणारे कर्ज कमी करण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत असते.

यापैकीच ‘पीएम किसान एफपीओ योजना’ ही योजना आहे, या योजनेअंतर्गत मोदी सरकार आता शेतकऱ्यांना शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे 15 लाख रुपये देत आहे.

उदाहरणाद्वारे सांगायचे झाले तर मोफत आणि स्वस्त रेशन योजना, शिक्षण, रोजगार, भत्ता, पेन्शन अशा अनेक योजना देशात सुरू आहेत. शेती व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी शेतकरी सरकारकडून 15 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकतात. जाणून घेऊयात या योजनेबद्दल.

FPO योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनेला 15 लाख रुपयांपर्यंत दिले जातात. यामध्ये 11 शेतकर्‍यांना मिळून एक कंपनी बनवावी लागेल. हा पैसा शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयोगी पडतो. या पैशातून शेतकऱ्यांना कृषी उपकरणे, बियाणे इत्यादी खरेदी करता येतात.

असा करा अर्ज

  • जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. येथे तुम्हाला FPO च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • नोंदणीसाठी तुम्हाला एक फॉर्म मिळेल, ज्यामध्ये तुम्हालातुमची सर्व आवश्यक ती माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला चेक किंवा पासबुक आणि तुमचे ओळखपत्र स्कॅन करून अपलोड करावे लागेल. सगळ्यात शेवटी तो फॉर्म सबमिट करा.