ट्रिपल तलाख विरोधात शिव राष्ट्र सेनेचे पोलिसांना निवेदन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने भिंगार येथील पिडीत भगिनीवर ट्रिपल तलाख विषयी झालेल्या अत्याचाराच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन येथे शिव राष्ट्र सेना अध्यक्ष संतोष नवसुपे यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी पोलिस निरीक्षक देशमुख साहेब यांच्या झालेल्या चर्चेत पिढीत भगिनीची माहेरची परिस्थिती ही नजुक असून तिला सासरकडून विविध रूपाने पैशाची मागणी करण्यात आली. तसेच तिला दोन मुली असून त्या भगिनीच्या पुढील आयुष्य हे कसे जाणार.

तिच्या नवर्‍याकडुन तिला मॅसेजवर तलाख पाठविण्यात आला असून; सदर घटना ही भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारी आहे. तसेच पहिल्या पत्नीची अनुमती शिवाय दुसरी पत्नी करता येत नाही. असे असुन देखील या पिढीत महिलेवर अनेक महिने व वर्ष अन्याय झाला आहे.

तरी आज या ठिकाणी पोलिस प्रशासनाच्या झालेली चर्चेदरम्यान संबधीत व्यक्ती विरोधात कारवाई करून भिंगार कँप पोलिस स्टेशन यांनी पिढीत भगिनीवर झालेल्या अन्याय च्या विरोधात न्याय द्यावा अशी मागणी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी मागणी केली.

यावर पोलिस अधिकारी साहेब यांनी सांगितले की, सदर प्रकरणात आम्ही पिढीत महिलेने ज्या दिवशी तक्रार दाखल केली त्याच वेळी गुन्हा दाखल केला. तसेच पुढील तपासात पुरावे सादर झाल्यास आम्ही पुढील योग्य ती कारवाई करू असे सांगितले.

या दरम्यान या भगिनीस तिच्यावर झालेल्या अन्याय विरोधात आज महाराष्ट्रात व देशात ही मॅसेज वर ट्रिपल तलाख पाठवुन ही पहिलीच घटना असून व तीचा छळ झालेला पाहुन शिव राष्ट्र सेना ही पिढीती च्या पाठीशी उभा राहून वेळ प्रसंगी पालकमंत्री हसन मुश्रीफ व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन अलिकडे महिलांवर होणारे अत्याचार पाहता वेळप्रसंगी निदर्शने करून न्याय मागण्यात येईल अशी माहिती अध्यक्ष श्री संतोष नवसुपे यांनी दिली.