पैसा येतो तेव्हा माणूस खूप आनंदी होता कामा नये ! म्हणणारा माणूस आज देशातला सर्वात श्रीमंत माणूस बनलाय !

गौतम अदानी आता केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअलटाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, त्यांची एकूण संपत्ती आज तब्बल 90 अब्ज डॉलर्स इतकी झालेली आहे आणि ते जगातील 10 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

अदानी यांनी केवळ 5 लाख रुपयांपासून त्यांचा व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू मोठे साम्राज्य उभे केले. अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या या अतुलनीय यशामागे त्यांची मेहनत, हुशारी, कौशल्य, नेटवर्किंग असे गुण आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण न करू शकलेल्या गौतम अदानीची कहाणी हिऱ्यांच्या व्यवसायापासून सुरू होते. वयाच्या १६ व्या वर्षी ते मुंबईत आले आणि हिऱ्यांचा व्यवसाय शिकू लागले. नंतर ते 1981 मध्ये गुजरातला परतले आणि आपल्या भावाच्या प्लास्टिक कारखान्यात काम करू लागले.

त्यांनी व्यवसाय जगतात पहिले मोठे पाऊल 1988 मध्ये टाकले, जेव्हा त्यांची पहिली कंपनी अदानी एक्सपोर्ट्स सुरू झाली. अवघ्या 5 लाख रुपयांच्या भांडवलाने सुरू झालेली ही कंपनी पुढे अदानी एंटरप्रायझेस बनली. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने 1994 मध्ये शेअर बाजारात प्रवेश करून मोठी चालना दिली.

तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये भारतात आर्थिक उदारीकरणाचा मार्ग मोकळा केला तेव्हा देशाच्या व्यावसायिक जगतात मोठा बदल घडून आला. यानंतर अनेक नवीन उद्योगपतींना पुढे जाण्याची संधी मिळाली. या बदलामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजलाच फायदा झाला नाही तर अदानी कुटुंबाला बहुराष्ट्रीय आणि वैविध्यपूर्ण व्यवसाय निर्माण करण्यास मदत झाली.

गौतम अदानी यांच्याबद्दल गेल्या काही वर्षांपासून अशी अटकळ बांधली जात होती की, ते लवकरच मुकेश अंबानींना मागे टाकतील. आज हे सर्व अंदाज खरे ठरले आहेत. व्यवसाय तज्ञांनी अदानी यांची तुलना मुकेश अंबानी यांचे वडील धीरूभाई अंबानी यांच्याशी केली आहे.

धीरूभाई अंबानींप्रमाणेच गौतम अदानी देखील पहिल्या पिढीतील उद्योगपती आहेत. मुकेश अंबानींसारखं मोठं व्यावसायिक साम्राज्य त्यांना वारसा म्हणून मिळालेलं नाही, पण धीरूभाईंसारख्या कष्टानं आणि कौशल्यानं त्यांनी हे स्थान मिळवलं.

लोकांचा एक वर्ग गौतम अदानी यांच्यावर टीका करत असला तरी सत्य हे आहे की भारतापासून ऑस्ट्रेलियापर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. आपण कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाशी संलग्न नसल्याचे स्वत: अदानी यांनी म्हटले आहे. सर्व पक्षात त्यांचे मित्र आहेत आणि पुढच्या पिढीची दृष्टी असलेल्या नेत्यांसोबतच काम करणे पसंत करतात.

अदानी यांना नेहमीच दूरदृष्टी असलेला व्यावसायिक नेता मानला जातो. संपत्तीच्या वाढ-कमीवर जगाने लक्ष ठेवले तरी ते स्वतः त्याकडे फारसे लक्ष देत नाही. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, जेव्हा पैसा येतो तेव्हा माणूस खूप आनंदी किंवा दुःखी होता कामा नये.

1995 हे वर्ष गौतम अदानी यांच्यासाठी खूप यशस्वी ठरले, जेव्हा त्यांच्या कंपनीला मुंद्रा बंदर चालवण्याचे कंत्राट मिळाले. गुजरात सरकारने मुंद्रा बंदर आणि कच्छमधील सेझचे कामकाज एका खासगी कंपनीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. गौतम अदानी यांच्या ताब्यात आले आणि आज ते खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठे बंदर बनले आहे.