Tata Nexon EV Max : सर्वाधिक विक्री करणारी टाटाची कार लाँच होणार नवीन अवतारात, मिळणार 453 किमीचे जबरदस्त मायलेज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Nexon EV Max : पेट्रोल डिझेल तसेच टाटा मोटर्स सतत भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार लाँच करत असते. या कंपनीची Nexon EV Max ही सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कार मानली जाते. आता ही कंपनी आपल्या चाहत्यांना नवीन भेट देण्याच्या तयारीत आहे.

कंपनी लवकरच Nexon EV चे डार्क एडिशन बाजारात लाँच करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीची ही कार सिंगल चार्जमध्ये 453 किमीचे जबरदस्त मायलेज देत आहे. जर कारच्या किमतीबाबत विचार करायचा झाला तर या कारची किंमत अजूनही जाहीर केली नाही.

जाणून घ्या Tata Nexon EV Max ची फीचर्स

कंपनी आपल्या नवीन Tata Nexon EV मध्ये जबरदस्त फीचर्स दिले जाण्याची शक्यता आहे. यात तुम्हाला गडद बॅजसह ग्लॉस ब्लॅक कलर, 16 इंच अलॉय व्हील्स, या कारला निळा अॅक्सेंट देण्यात येणार आहे. नवीन 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, हवेशीर जागा, इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, एअर प्युरिफायर आणि इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक नवीन नेक्सॉन ईव्ही डोअर एडिशनमध्ये देण्यात येऊ शकतात.

जाणून घ्या पॉवरट्रेन

कंपनीच्या या कारमध्ये एक मजबूत पॉवरट्रेन दिली जाऊ शकते. यात कंपनीकडून 40.5 kWh क्षमतेची लिथियम आयन बॅटरी दिली जाणार आहे. ही बॅटरी IP-67 रेटिंगसह येत असून जी 143 PS वर 250 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. एका चार्जमध्ये सुमारे 453 किमी चालवता येते असा दावा कंपनीने केला आहे. असे मानले जात आहे की कंपनी या वर्षाच्या मध्यापर्यंत ही कार सादर करू शकते.

किंमत

हे लक्षात घ्या की कंपनीने सध्या या कारच्या किंमतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. मात्र असे मानले जात आहे की कंपनी याला जवळपास 17 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत बाजारात लॉन्च करेल.