Aadhaar Card Address : काही मिनिटांत बदलेल पत्ता, त्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhaar Card Address : आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे एक सरकारी कागदपत्र आहे. प्रत्येक कामात त्याचा वापर केला जातो. जर हे नसेल तर आपली अनेक कामे अडकू शकतात. त्यात काहीजण नोकरीसाठी किंवा इतर काही कामासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे राहायला जातात.

परंतु, आधार कार्डवरील पत्ता कसा बदलायचा असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो, जर तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर काळजी करू नका. तुम्ही आता काही मिनिटात तुमच्या मोबाईलवरून तो बदलू शकता. त्यासाठी काही स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील.

फॉलो करा या स्टेप्स

स्टेप 1

सर्वात अगोदर तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटhttp://uidai.gov.in वर जावे लागेल.
त्यानंतर ‘अपडेट तुमचे आधार’ या विभागात क्लिक करा..

स्टेप 2

त्यानंतर ‘अपडेट डेमोग्राफिक डेटा ऑनलाइन’ या पर्यायावर क्लिक करा
तुमच्यासमोर UIDAI चे ‘सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल’ दिसेल.
तेथे ‘Proceed to Update Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 3

12 अंकी आधार क्रमांक, स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड आणि मोबाइल नंबर टाका.
त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवण्यात येईल.
तो टाकून सबमिट वर क्लिक करा
‘अपडेट डेमोग्राफिक डेटा’ वर क्लिक करा.

स्टेप 4

त्यानंतर पुढे आता ‘प्रोसीड’ वर क्लिक करावे लागेल.
येथे तुम्हाला जुना पत्ता दिसेल, तेथे नवीन पत्त्यासह काही महत्त्वाची माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा.
त्यानंतर तुम्हाला त्याचे पूर्वावलोकन दिसेल आणि सबमिट वर क्लिक करा
यानंतर तुमचा नवीन पत्ता आधार कार्डमध्ये अपडेट केला जाईल.