Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Hyundai EV : सर्वात जास्त विक्री होणारी SUV आता EV मध्ये येणार! सिंगल चार्जवर धावणार 400 किमी, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Hyundai च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता सर्वात लोकप्रिय SUV आता नवीन म्हणजे इलेक्ट्रिक अवतारामध्ये येणार आहे.

Hyundai EV : कार निर्माता कंपनी ह्युंडाईने भारतीय ऑटो बाजारात आपली ओळख खूप कमी काळात बनवली. या कंपनीच्या सर्व कार या कमी किमतीत जास्त फीचर्स आणि मायलेज असल्याने कंपनीच्या कारला सर्वात जास्त मागणी आहे. कंपनी सतत इतर कार कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नवनवीन कार लाँच करत असते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच आता नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कंपनीची ही सर्वात जास्त विक्री होणारी SUV आहे. तीच आता नवीन अवतारात येत आहे. जी सिंगल चार्जवर 400 किमी इतकी धावते. जाणून घ्या या कारची किंमत आणि फीचर्स.

भारतात लॉन्च होणार 6 EV

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी येत्या 2028 पर्यंत भारतात सहा EV कार लॉन्च करण्याच्या तयारी करत आहे. Creta EV ही त्या कारपैकी एक असून कंपनी ती कार SU2i EV प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीची Hyundai Creta EV एकाच चार्जवर 400 किमी चालेल. कंपनी यात 134 bhp पॉवरची इलेक्ट्रिक मोटर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जे 395 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

फक्त 6 तासांत चार्ज होते बॅटरी

कंपनीच्या नवीन कारला 39.2 kWh पॉवर लिथियम बॅटरी पॅक मिळू शकतो. तिची बॅटरी सुमारे 6 तासांत चार्ज होते. या कारसोबत 50 kW चा DC चार्जर उपलब्ध असणार आहे. सध्या, या कंपनीने कारची किंमत आणि अधिकृत लॉन्च तारखेचा कोणताही खुलासा केलेला नाही. Autocarindia वेबसाइटनुसार, Hyundai Creta EV 2025 च्या सुरुवातीला लॉन्च होऊ शकते. क्रेटा ईव्ही 15 ते 30 लाख एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत बाजारात उपलब्ध असणार आहे.

काय आहे लाँच करण्यामागचे कारण

क्रेटा ही कंपनीच्या एसयूव्ही सेगमेंटमधील सगळ्यात शक्तिशाली कार आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 मध्ये या कारची अनुक्रमे 15037 आणि 10421 युनिट्सची विक्री झाली असून ही कंपनीची सर्वात जास्त पसंतीची एसयूव्ही आहे.