जिल्ह्यात शनिवार रविवार बंद तर सायंकाळी पाचनंतर पुन्हा संचारबंदी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्या आल्याच्या दिसताच जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले.

मात्र पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढली असल्याने जिल्ह्यात निर्बंध पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहे. यामुळे आता नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी झालेले बदल जाणून घेणे अपेक्षित आहे.

जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी शनिवारी (दि. २६) याबाबत आदेश काढले. पाॅझिटिव्हिटी रेट व ॲाक्सिजन बेडवरील रुग्णांचे प्रमाण या आधारे निर्बंधस्तर जाहीर करण्यात आले होते. पहिल्या स्तरामध्ये असलेला नगर जिल्हा आता स्तर तीनमध्ये गेला आहे.

यामुळे नवीन निर्बंध शासनाकडून लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार सायंकाळी ५ ते सकाळी ५ या वेळेत वैद्यकीय कारण वगळता कोणासही बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

नवीन निर्बंध आणि कालावधी

  • अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते दुपारी ४
  • इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ (शनिवार, रविवार पूर्ण बंद)
  • माॅल्स, थिएटर्स (नाट्यगृह) पूर्णपणे बंद
  • हाॅटेल, रेस्टाॅरंट ५० टक्के क्षमतेसह (सकाळी ७ ते दु. ४ (४ नंतर केवळ पार्सल)
  • सार्वजनिक ठिकाणे, खुले मैदाने, सायकलिंग व माॅर्निंग वाॅक सकाळी ५ ते सकाळी ९
  • खासगी आस्थापना, कार्यालये दुपारी ४ वाजेपर्यंत
  • खासगी, सरकारी कार्यालयीन उपस्थिती ५० टक्के
  • खेळ (मैदानावरील) सकाळी ५ ते सकाळी ९, सायं ६ ते रात्री ९
  • सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम (सकाळी ७ ते दुपारी ४) (५० टक्के मर्यादेत)
  • विवाह समारंभ ५० व्यक्तीं तर अंत्यविधी २० व्यक्तींच्या उपस्थितीत
  • बैठका, निवडणुका, वार्षिक सभा आसनक्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत
  • कृषी संबंधित दुकाने, आस्थापना सकाळी ७ ते दुपारी ४
  • ई-काॅमर्स (वस्तू व सेवा) नियमितपणे सुरू राहतील
  • जिम, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर सकाळी ७ ते दु. ४ (५० टक्के क्षमतेने)
  • सार्वजनिक बस वाहतूक १०० टक्के क्षमतेने
  • कार्गो वाहतूक (केवळ ३ व्यक्ती) नियमित सुरू राहील.
  • आंतरजिल्हा प्रवास (खासगी बस, कार, टॅक्सी) नियमित सुरू.
  • उत्पादन घटक, कंपन्या नियमित सुरू राहील.