या तालुक्यात हत्ती गवतापासून सुरू होणार इंधन निर्मिती प्रकल्प

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :-  श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे हत्ती गवतापासून (नेपिअर) जैविक इंधन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कोळगावमध्ये एमएलसी अंतर्गत प्रचेता क्लिनफ्युअल लिमिटेड व शिधा फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या माध्यमातून हा प्रकल्प उभा राहत आहे.

या प्रकल्पात पर्यायी इंधन आणि सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. याचा लाभ शेतकर्‍यांना होणार आहे. तसेच स्थानिक नागरीकांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे. सध्या पेट्रोल, डिझेलचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचले असून सातत्याने इंधनाच्या किमंतीमध्ये वाढ होत आहेत.

पर्यायी इंधन म्हणून भारत सरकारने प्लल बायो सीएनजी प्रकल्प, बायो पीएनजी प्रकल्प, तसेच सेंद्रिय खत निर्मितीला प्राधान्य दिले आहे. याच हेतूनेे कोळगावमध्ये हा प्रकल्प होत आहे. हत्ती गवताला गनिगोल, नेपिअर गवत देखील संबोधले जाते.

या गवतावर प्रक्रिया करून जैविक इंधन निर्मिती करण्यात येणार असून प्रति टन एक हजार रुपये भावाने हे गवत कंपनी खरेदी करणार आहे. या कंपनीचे शेतकरी सभासद फी 250 रुपये व शेअर फी 250 रुपये असून क्षमते नुसार शेअर विकत घेता येणार आहेत.

तालुक्यात किमान दहा हजार सभासद करण्यात येणार आहेत. यानंतर सभासद शेतकर्‍यांना बियाणे पुरवणे या पिकासाठी लागणारी सेंद्रिय खत देखील पुरवले जाणार आहे. आज संपूर्ण जग प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच त्याच्या ऊर्जेचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अनेक संशोधन करून आवश्यक पावले उचलत आहे.

या क्रमाने, जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक भारतात लवकरच जैवइंधन तयार करणार आहे. हे इंधन स्वयंपाकापासून ते औद्योगिक क्षेत्रासाठी देखील वापरले जाऊ शकते.