सरकारचा मृत्यूची आकडेवारी लपवून अपयश झाकण्याचा प्रयत्न आ.राधाकृष्ण विखे यांची टीका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची खरी आकडेवारी बाहेर येवू देवू नका, आशा सूचना राज्यात सर्व  जिल्ह्यांमधील प्रशासनाला असाव्यात आशी शंका भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केली.

मृत्यूची आकडेवारी लपवून अपयश झाकण्याचा प्रयत्न सरकारने केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. पत्रकारांशी बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की,मृत्यूची आकडेवारी लपविण्याच्या प्रकार हा फक्त मुंबईतच नाही तर तो राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये झाला असावा आशी शंका आता उपस्थित होते.

कारण वस्तूस्थिती समोर येवू द्यायची नाही आशा सूचनाच प्रशासनाला दिल्या असाव्यात यातून सरकार आपले अपयश झाकत असले तरी सत्य हे उघड झाल्याशिवाय राहात नाही.

मृत्यूच्या आकडेवारीत दिसून आलेली तफावत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. आकडेवारी लपविण्यात वेळ घालवण्यापेक्षा मंत्री आणि अधिकाऱ्यांनी जनतेला सेवा देण्याचा प्रयत्न केला असता तर नागरिकांना दिलासा मिळाला असता. परंतू मंत्री फक्त बैठकांमधून आढावा घेत बसले.

उपाय योजना कोणत्याही झाल्या नाहीत. सरकारकडून रेमडीसिव्हर अथवा ऑक्सिजनचे कोणतेही व्यवस्थापन होवू शकले नाही. आघाडी सरकारचे मंत्री आपले अपयश झाकण्यासाठी फक्त केंद्राकडे बोट दाखवित बसल्याची टिका आ.विखे यांनी केली.

अहमदनगर लाईव्ह 24