परिस्थिती हाताबाहेर…मुख्यामंत्र्यांनी दिल्लीत लॉकडाउन वाढवला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-करोनाच्या तीन लाटांचा यशस्वीपणे सामना करणाऱ्या दिल्लीची चौथ्या लाटेनं झोप उडवली आहे. कधी नव्हे इतकी रुग्णवाढ दिल्लीत दररोज नोंदवली जात असून, मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे.

रुग्णवाढीचा वेग, कोलमडण्याच्या मार्गावर असलेली आरोग्य व्यवस्था, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रडकुंडीला आलेली रुग्णालये आणि रुग्णांचे होत असलेले मृत्यू ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने दिल्लीतील लॉकडाउन एका आठवड्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. नवी दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राज्य सरकारने 19 एप्रिलला एक आठवड्यासाठी लॉकडाऊन लागू केला होता.

हा लॉकडाऊन उद्या 25 एप्रिलपर्यंत लागू होता. पण तरीही कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने हा लॉकडाऊन एक आठवड्यांसाठी वाढवला आहे. यानुसार येत्या 3 मे पर्यंत नवी दिल्लीत लॉकडाऊन असणार आहे.

मागील एका आठवड्यांपासून दिल्लीत लॉकडाउन लागू केलेला आहे. या काळात दिल्लीत रुग्णसंख्येत कोणतीही घट झालेली नाही. उलट ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दिल्लीतील आरोग्य व्यवस्था हतबल झाली आहेत.

अनेक रुग्णालयात ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू झाले असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने लॉकडाउन एका आठवड्याने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवाल यांनी पत्रकार परिषदे घेऊन याची माहिती दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|