Health Tips : निरोगी मेंदूसाठी गरजेची आहेत ‘ही’ पोषक तत्त्वे, आहारात करा समावेश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Tips : आपल्या शरीरात मेंदू हा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे काम मेंदू करतो. त्यामुळे मेंदू निरोगी राहण्यासाठी सकस आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे.

मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश गरजेचे आहे. नाहीतर तुम्ही खूप मोठ्या आजारांना निमंत्रण द्याल. हे आजार जर टाळायचे असतील तर पोषक तत्त्वे असलेला आहार घ्या.

ओमेगा 3 फॅटी ऍसिडस्

आपल्या शरीराला ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् गरजेचे असते, कारण यामुळे मेंदूला पोषण मिळते. त्यामुळे मेंदूचे कार्य चांगले राहण्यासोबतच स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.

या पौष्टिकतेने समृध्द अन्न खाल्ल्याने नैराश्यासारख्या मानसिक आरोग्य विकारांचा धोका कमी होतो. यासाठी मासे, काजू आणि वनस्पतींवर आधारित तेलाचा वापर केला जाऊ शकतो असे अभ्यासात आढळून आले आहे,

लोह गरजेचे

आहारात लोहाचे प्रमाण गरजेचे आहे. लोहाच्या कमतरतेमुळे संज्ञानात्मक विकास, डीएनए संश्लेषण, न्यूरोट्रांसमीटरच्या क्रिया बिघडण्याची शक्यता असते. जे लोक नियमितपणे दुग्धजन्य पदार्थ तसेच हिरव्या भाज्या खातात त्यांच्या मेंदूमध्ये लोहाची पातळी चांगली असते.

व्हिटॅमिन बी 12

आहारात व्हिटॅमिन बी 12 असलेल्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. यामुळे मानसिक आरोग्य आणि कार्यप्रणाली चांगली राहते. या जीवनसत्वाची कमतरता हे स्मरणशक्तीशी निगडित विकारांचे मुख्य कारण असते. मेंदूच्या शोषापासून बचाव करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. यासाठी मांस, मासे, अंडी, हिरव्या भाज्या आणि काजू खा.

व्हिटॅमिन-डी

व्हिटॅमिन डी केवळ हाडांच्या विकासासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी गरजेचे आहे.यामुळे वृद्धांमध्ये स्मृतिभ्रंश होण्याचा धोका टळतो. व्हिटॅमिन-डीची कमतरता असलेल्या लोकांना संज्ञानात्मक आरोग्य विकारांचा धोका जास्त असल्याचे दिसून येते. त्यासाठी सूर्यप्रकाश हा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. मशरूम, शेंगदाणे, अंडी, दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारामधून व्हिटॅमिन-डी मिळते.