Year Ender 2022 : ह्यावर्षी व्हॉट्सॲपने युजर्ससाठी आणली ‘ही’ जबरदस्त फीचर्स, पहा यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Year Ender 2022 : व्हॉट्सॲप आपल्या सर्वांचे जिव्हाळ्याचे आणि सगळ्यात प्रसिद्ध प्लॅटफॉर्म आहे. व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन आणि जबरदस्त फीचर्स लाँच करत असते.

2022 हे वर्ष जवळपास संपत आले आहे आणि या वर्षी व्हॉट्सॲपने अशीच जबरदस्त फीचर्स आणली आहे. पाहुयात ही फीचर्स कोणती आहेत आणि याचा फायदा काय आहे?

स्वतःला संदेश पाठवता येणार

यावर्षी WhatsApp ने मेसेज युअरसेल्फ हे फीचर आणले असून याच्या मदतीने यूजर्स स्वतःला मेसेज करता येईल. यामध्ये एका मेसेजसोबतच फोटो, व्हिडिओ इत्यादी पाठवता येणार आहे.

चॅट पोल तसेच 32 जणांना ग्रुप व्हिडिओ कॉल

आता चॅटिंग करत असताना चॅट पोलही सुरू करू शकाल. तसेच आता व्हिडिओ कॉल करताना एकूण 32 जणांना एकत्र जोडू शकतो.

इमोजी रिॲक्शन

तसेच व्हॉट्सॲपने इमोजी रिॲक्शनचे नवीन फीचरही आणले असून याच्या मदतीने वापरकर्त्यांना कोणत्याही मेसेजवर प्रतिक्रिया देता येत आहे.

प्रायव्हसी आणि व्हॉइस मेसेज

वापरकर्त्यांची प्रायव्हसी लक्षात घेता नवीन फीचर्स लाँच केले. यामध्ये व्हॉईस मेसेजशी निगडित अनेक नवीन फीचर्स आणली आहेत.