अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नेवासा तालुक्यातील गळनिंब येथून 57 हजार रुपये किंमतीच्या शेळ्यांची चोरीची झाल्याची घटना घडली आहे. याबाबत कृष्णा मनोहर शेळके (वय 40 वर्षे) यांनी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दाखल फिर्यादीत म्हंटले आहे की, माझा शेती व्यवसाय असुन गळनींब शिवारात शेतीला जोडधंदा म्हणुन माझ्याकडे 20 शेळया असुन मी शेळी पालन करतो. मी स्वत: शेळया चारण्यासाठी गळनिंब शिवारात जात आसतो.

एके दिवशी कृष्णा मनोहर शेळके व भाऊसाहेब मारुती खर्जुले हे शेळया चारण्यासाठी गळनिंब शिवारातील पाटाचे कडेला घेऊन गेलो होतो. त्यानंतर शेळया चारता चारता त्याच दिवशी चारण्यासाठी नेलेल्या 20 शेळया पैकी 3 शेळया कमी भरत होत्या.

त्यानंतर भाऊसाहेब मारुती खर्जुले यांची 1 शेळी कमी भरत होती, हरवलेल्या शेळयाचा शोध घेतला परंतु परंतु शेळया मिळुन आल्या नाही. आजुबाजूस शेतक-यांकडे चौकशी केली त्यांनी कळविले की, एक पांढ-या रंगाच्या मालवाहू गाडी शिरसगाव रोडने जातानी आम्ही पाहिले.

त्यामध्ये शेळया ओरडत होत्या. त्यानंतर एका ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज तपासले असता सदरची गाडी गळनींब येथील विलास खंडेराव मुळे यांची आहे. आम्ही याप्रकरणी सदर इसमाकडे गेलो. त्याचेकडे आम्ही चौकशी केली. त्याने मीच शेळया नेल्याची कबुली दिली.

शेळ्या चोरल्याच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात दिपक लक्ष्मण गणगे व रामा सखाहरी गणगे दो.रा.सुरेगाव दही ता. नेवासा व विलास खंडेराव मुळे रा.गळनिंब ता. नेवासा यांचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.