अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-   ऑगस्ट महिन्याचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन शिक्षक दिनापूर्वी अदा करुन शिक्षक दिन व गणेशोत्सव गोड करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, संघटनमंत्री सुहास हिर्लेकर यांनी शिक्षण आयुक्तांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली. अनेक महिन्यांपासून राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन वेळेवर होत नाही. राज्यातील काही विभागातील शाळा यांचे वेतन तर दोन-दोन महिने उशिरा होत आहे.

त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येत्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिन आहे. तसेच 10 सप्टेंबरला गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. मंत्रालयातून योग्य वेळेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने पाठपुरावा करून वेतन निधी मंजूर करून घेतला आहे.

त्याचे तातडीने वितरण मुंबईसह राज्यातील सर्व विभागात झाल्यास शिक्षक, शिक्षकेतर यांचे वेतन शिक्षक दिनापुर्वी होऊ शकणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शिक्षक, शिक्षकेतरांचा शिक्षक दिन व गणेशोत्सव गोड होण्यासाठी पाच सप्टेंबर पूर्वी राज्यातील सर्व शिक्षकांचे वेतन होण्यासाठी संबंधितांना आपल्या स्तरावर आदेश निर्गमित करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.

शिक्षक, शिक्षकेतरांना वेळेत वेतन मिळण्यासाठी शिक्षक परिषद प्रयत्नशील असल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी म्हंटले आहे. या मागणीसाठी जिल्ह्यातील शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, अशोक झिने, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, सखाराम गारूडकर, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे,

शुभांगी थोरात, विनिता जोशी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल काकर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, महादेव देवकर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, संदीप झाडे, राहुल ज्योतिक,

प्रविण उकीर्डे, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, जालिंदर शिंदे, सत्यवान थोरे, प्रदीप बोरूडे, युनूस शेख आदी प्रयत्नशील आहेत.