दोन गाड्यांचा समोरासमोर भिषण अपघात ! खासदार सदाशिव लोखंडे …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  श्रीरामपूरतालुक्यातील उक्कलगाव येथे दोन दुचाकींचा समोरासमोर भिषण अपघात झाल्याची घटना घडली असून, या घटनेत एक जण गंभीर जखमी होऊन दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघातावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे संगमनेरला जात असताना हा अपघात दिसल्याने त्यांनी जखमींची विचारपूस करून त्यांना आपल्या गाडीत दवाखान्यात दाखल केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उक्कलगावकडून कोल्हारच्या दिशेने एकलहरे (आठवाडी) येथील धर्मेंद्र शिंदे यांचा मुलगा व सून बुलेटवर संगमनेरकडे बहिणीला भेटण्यासाठी चालले होते.

समोरून कोल्हारकडून येणार्‍या डिस्कव्हरवर विजय बाबुराव उपाध्ये (रा.सात्रळ-सोनगाव) हे आपली पत्नी व दोन मुलांसह बेलापूर येथे लग्न समारंभासाठी येत होते.

दरम्यान दोन्ही दुचाकी परस्परविरोधी दिशेने उक्कलगावातील फर्‍याबागनजीक आल्या असता त्यांचा समोरासमोर भिषण अपघात होऊन दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले तर विजय बाबुराव उपाध्ये किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, खा.सदाशिव लोखंडे काही कामानिमित्त संगमनेरला चालले होते. त्यांनी घटनास्थळी थांबून जखमींची विचारपूस केली व अ‍ॅम्ब्युलन्स मिळत नसल्याने स्वत:ची गाडी जखमींना दवाखान्यात जाण्यासाठी दिली.

तोपर्यंत ते उक्कलगावमध्ये थांबून राहिले. घटना समजताच घटनास्थळी उक्कलगावच्या नागरिकांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले.