अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- आपल्या भावासोबत सासरी जाणाऱ्या नवविवाहितेला एका भरधाव कंटेनरने धडक दिल्याची दुर्दैवी घटना कोपरगाव शहरातील नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या मोठ्या पुलावर घडली आहे.

या धडकेत नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती ग्रामीण रुग्णालयातून मिळाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

भाऊ बहिनेच्या अतूट प्रेमाचा सण रक्षाबंधन या निमित्ताने मूळ कोपरगाव येथील नवविवाहिता प्रियंका सचिन साळुंके (वय २४)हल्ली रा.मालूजे खुर्द ता श्रीरामपूर ही कोपरगाव येथे आली व मोठ्या आनंदाने सण साजरा करून

आपल्या सासरी भावासोबत मोटारसायकल वरून जात होती. यावेळी कोपरगाव शहरातील नगर – मनमाड महामार्गावर असलेल्या मोठ्या पुलावर दुचाकी आणि कंटेनरचा अपघात होऊन या अपघातात नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.