UPSC Interview Questions : कोणता प्राणी निलगिरीच्या झाडापेक्षा उंच उडी मारू शकतो? जाणून घ्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये असे अनेक प्रश्न विचारले जातात ज्याची उत्तरे इतकी सोप्पी असतात मात्र तेच प्रश्न (Questions) डोकं खाजवायला लावतात. त्या प्रश्नाची उत्तरे अनेकदा आपल्या अवतीभवतीच असतात मात्र आपल्या लक्षात येत नाही. असेच प्रश्न UPSC च्या मुलाखतीतही (Interview ) विचारले जातात.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी केवळ पुस्तकी (Book) माहिती पुरेशी नाही. असे प्रश्न अनेकदा सरकारी भरतीच्या (Government recruitment) मुलाखतींच्या फेऱ्यांमध्ये विचारले जातात ज्यांना उत्तर देण्यासाठी ज्ञान तसेच मनाची उपस्थिती आवश्यक असते.

मुलाखतीच्या दडपणाखाली मन कुशाग्र असणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या तयारीसाठी असेच काही अवघड प्रश्न आणि त्यांची उत्तरे आम्ही तुम्हाला सांगतो. जाणून घ्या UPSC मुलाखतीमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाची उत्तरे…

प्रश्न: कोणता प्राणी निलगिरीच्या झाडापेक्षा उंच उडी मारू शकतो?
उत्तरः कोणताही प्राणी जो उडी मारू शकतो, कारण निलगिरीचे झाड उडी मारू शकत नाही.

प्रश्न: अशी कोणती गोष्ट आहे जिची चव कधीच तोंडातून निघू शकत नाही?
उत्तरः स्वतःची जीभ.

प्रश्न: तुम्ही शर्यतीत धावत आहात. दुसऱ्या क्रमांकाच्या धावपटूला तुम्ही मागे टाकले. आता तुम्ही कोणत्या नंबरवर आहात?
उत्तरः क्रमांक दोन. प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रथम क्रमांकाच्या धावपटूला मागे सोडावे लागेल.

प्रश्न: एक मुलगी 20 फूट उंच शिडीवरून पडली पण तिला अजिबात दुखापत झाली नाही, हे कसे शक्य आहे?
उत्तरः ती शिडीच्या सर्वात खालच्या पायावरून पडली आहे.

प्रश्न: तुम्ही ३० दिवस खाल्ल्याशिवाय किंवा झोपल्याशिवाय जगू शकता का?
उत्तर: का नाही, तुम्ही रात्री जेवू शकता आणि झोपू शकता.