विराट कोहलीवर येऊ शकते आयसीसी बंदीची कारवाई, आयसीसीचे नियम काय सांगतात पाहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेचा निकाल यजमानांच्या बाजूने २-१ असा लागला आहे. भारताला तिसऱ्या कसोटी सामन्यासह मालिका गमवावी लागली, त्याचबरोबर आता भारताला अजून एक धक्का बसू शकतो.(Virat Kohli)

कारण भारताचा कर्णधार विराट कोहलीने रागाच्या भरात डीआरएस विरुद्ध केलेल्या टिकेमुळे आता कोहलीवर आयसीसी बंदीची कारवाई करू शकते. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आर अश्विनने टाकलेल्या २१ व्या षटकातील एक चेंडू दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरच्या पॅडवर आदळल्याने सर्वांनी जोरदार अपील केले.

मैदानावरील पंच एराम्सस यांनी लगेच बोट वर करून आउट चा इशारा केला. मोठी विकेट मिळाली म्हणून भारतीय खेळाडू आनंदात होते. पण, एल्गरने लगेच डीआरएस घेतला.

चेंडू स्टम्प्सवर आदळत असल्याचा विश्वास सर्वांनाच होता, पण रिप्लेत चेंडू स्टम्प्सच्या वरून जाताना दिसला आणि एराम्सस यांना आपला निर्णय बदलावा लागला. त्यावेळेस एराम्सस यांनी हे शक्य नाही अशीच प्रतिक्रिया दिली.

या घटनेवर कोहलीला राग आला व त्याने षटक संपल्यानंतर स्टम्प्स माईककडे जाऊन म्हणाला की, ”तुमचा संघ जेव्हा चेंडू चमकवतात तेव्हा त्यांच्यावरही लक्ष ठेव, फक्त प्रतिस्पर्धी संघावर नको. लोकांचं लक्ष वेधण्याचा सतत प्रयत्न करत असतोस.” क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे.

त्यामुळे जो कोणी या खेळाची प्रतिमा मलीन करतो किंवा त्याला धक्का पोहोचवतो, त्याच्यावर आयसीसी कडक कारवाई करत असल्याचे सर्वांनीच पाहिले आहे.

या घटनेवर आता कोहलीची कोणी तक्रार केली असेल, किंवा सामनाधिकाऱ्यांना हा प्रकार गैर वाटला असेल तर कोहलीवर कारवाही होऊ शकते.

सामनाधिकारी यावेळी कोहलीवर बंदीचीही कारवाही करू शकतात. कोहलीने मैदानात जी गोष्ट केली आहे, ती नक्कीच क्रिकेटच्या खेळाला शोभणारी नाही. पण कोहलीवर नेमके कोणते आरोप केले जातात, हे सर्वात महत्वाचे ठरणार आहे.