Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Weight Loss Tips : मेणासारखी वितळेल चरबी! फक्त रोज घ्या ‘हे’ पेय, कसे ते जाणून घ्या अधिक…

Weight Loss Tips : सध्याच्या धावपळीच्या काळात अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यापैकी एक समस्या म्हणजे वाढते वजन. सध्या दहा पैकी प्रत्येकी पाच जण तरी वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त असतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

काहीजणांना तर कितीही उपचार केले तर फरक पडत नाही. परंतु तुम्ही आता कोणत्याही औषधाशिवाय वाढते वजन कमी करू शकता. तुम्ही आता काही विशेष पेय प्यायले तर तुमची मेणासारखी चरबी वितळेल. तुम्हाला फक्त रोज हे पेय घ्यावे लागणार आहे.

वजन कमी करायचे असेल तर घ्या ग्रीन टी

ग्रीन टी हे आरोग्यदायी पेयांमध्ये गणले जात असले तरी ते फक्त आरोग्यदायीच नाही तर वजन कमी करण्यातही खूप फायदेशीर आहे. यात जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळत असून हे कमी कॅलरी पेय आहे जे चयापचय निरोगी ठेवते तसेच चरबी जाळण्याची शरीराची क्षमता वाढवत असते.

परंतु जर तुम्हाला जलद वजन कमी करायचे असेल तर फक्त ग्रीन टीवर अवलंबून राहावे लागणार नाही, तर काही व्यायाम देखील करावे लागतील. जेणेकरून तुमचे झटपट वजन कमी होईल. या ग्रीन टीमध्ये वेगवेगळे अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे शरीराला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवत असतात.

तसेच त्यात बीटा-कॅरोटीन असून जे चांगले आरोग्य राखते. कॅटेचिन जे चयापचय वाढवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करत असते. ग्रीन टी चे सेवन केले तर शरीरातील चयापचय गती वाढत शिवाय चरबीचे ऑक्सिडेशन वाढून इन्सुलिनची क्रिया सुधारते.

हा ग्रीन टी तुम्ही सकाळी किंवा दुपारी आणि रात्री पिऊ शकतो. परंतु हे लक्षात ठेवा की जर तुम्ही रात्री ग्रीन टी पीत असल्यास जेवल्यानंतर अर्ध्या तासानंतर प्या.

हे पेय देखील आहेत खूप फायदेशीर

रात्री ग्रीन टी शिवाय तुम्ही इतर काही पेये पिऊ शकता. दीड ग्लास पाण्यात अर्धा चमचा अजवाइन उकळवा. ते शिजल्यानंतर एक ग्लास पाणी बरोबर आल्यावर ते गाळून ग्लासमध्ये काढा.

वजन कमी करायचे असेल तर जेवण केल्यानंतर अर्ध्या तासानंतर हे पाणी पिऊ शकता. जेवण केल्यानंतर बडीशेपचे पाणी उकळवून प्या. हे पचनासाठीही खूप फायदेशीर असते.